Advertisement

कोरोनाचा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात एका महिन्यात १२९७ वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट
SHARES

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात एका महिन्यात १२९७ वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 72 जणांचा मृत्यू झाला आहे. संपू्र्ण भारताचा विचार करता कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट आहे.  

पुण्यामध्ये ९ मार्चला एका दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं. त्याला गुरुवारी एक महिना होत आहे. ३० दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १००० च्या वर गेली.  देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट आहे. पुण्यातील राज्यात सापडलेले कोरोनाचे हे पहिले रूग्ण नुकतेच दुबईहून परतले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हे दाम्पत्य आता पूर्ण बरे झाले आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहे. मुंबईत ही संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी अजून महाराष्ट्र दुसऱ्याच टप्प्यात आहे. जे परदेशातून आलेले आहेत आणि त्यांच्या जे संपर्कात आलेले आहेत त्यांनाच या आजाराची लागण झाल्याचे समोर येत आहे. राज्यात अजून समूह संसर्गाला सुरूवात झालेली नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.


हेही वाचा -

Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा