डेंग्यूच्या जनजागृतीवर महिन्याला सव्वा आठ कोटी खर्च

  Pali Hill
  डेंग्यूच्या जनजागृतीवर महिन्याला सव्वा आठ कोटी खर्च
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईकरांसाठी डेंग्यूचा 'ताप' बनला आहे. डेंग्यूने मुंबईत थैमान घातले असून तीन वर्षांत 31 जणांचा बळी घेतला आहे, असं असताना मुंबई महानगर पालिकेचे आरोग्य विभाग डेंग्यूवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरले आहेत. आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी महिन्याला सव्वा आठ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र तरीही डेंग्यूचा कहर काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने गेल्या तीन वर्षांत, 2013 ते 2015 दरम्यान 2.98 कोटी रुपये जनजागृतीवर खर्च केले आहेत. मात्र तरीही डेंग्यूच्या रूग्णांची आणि बळींचा संख्या काही घटली नसल्याची माहिती समोर आली आहे. 2013 मध्ये डेंग्यूचे 11, 2014 मध्ये 12 आणि 2015 मध्ये 8 बळी गेले आहेत. इतका पैसा खर्च करूनही जनजागृती मोहीम यशस्वी होत नसल्याने आरोग्य विभाग कुठे कमी पडतोय याचा बारीक विचार होण्याची गरज आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.