Advertisement

पावसाळी आजारांसाठी प्रत्येक वॉर्डातील दवाखाने, प्रसुतिगृह, हेल्थ पोस्ट सज्ज

कोरोनाविरोधात लढण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा गुंतली असताना मलेरिया, डेंग्यू, हिवताप, कावीळ या आजारांवर त्वरित उपचार मिळावे यासाठीही पालिकेने कंंबर कसली आहे.

पावसाळी आजारांसाठी प्रत्येक वॉर्डातील दवाखाने, प्रसुतिगृह, हेल्थ पोस्ट सज्ज
SHARES
Advertisement

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, हिवताप, कावीळ असे विविध आजार डोके वर काढतात. अनेक मुंबईकर या आजारांना बळी पडतात. कोरोनाविरोधात लढण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा गुंतली असताना मलेरिया, डेंग्यू, हिवताप, कावीळ या आजारांवर त्वरित उपचार मिळावे यासाठीही पालिकेने कंंबर कसली आहे. पालिकेच्या 24 वॉर्डातील दवाखाने, प्रसुतिगृह, हेल्थ पोस्टसह नॉन कोविड रुग्णालये पावसाळी आजारांवर मात करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

कोरोना विरोधात लढा देत असताना पुढील काही दिवसांत पावसाळी आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. मलेरिया, डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती स्थानांचा शोध घेत ती नष्ट करण्यात येत असून ही मोहीम पुढेही चालूच ठेवण्यात येणार आहे. तसंच मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नॉन कोविड रुग्णालये,  दवाखाने,  प्रसुतिगृह, हेल्थ पोस्ट सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक वाडॉतील दोन ते तीन दवाखाने,  प्रसुतिगृह, हेल्थ पोस्ट या ठिकाणी मलेरिया, डेंग्यू,  हिवताप,  अतिसार, कावीळ, लेप्टो अशा विविध आजारांवर वेळीच उपचार करण्यात येतील.

पावसाळ्यात उद्भवणारे हे आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.  नॉन कोविड रुग्णालयात पावसाळी आजारांवर वेळीच उपचार करता यावे, विशेष ओपीडी व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

 महापालिका क्षेत्रातील सुमारे 264 किलोमीटर लांबीच्या 280 मोठय़ा नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये शहर भागातील सुमारे 22 किलोमीटर लांबीचे 27 मोठे नाले, पूर्व उपनगरातील 102 किलोमीटर लांबीचे 111 मोठे नाले, तर पश्चिम उपनगरातील 140 किलोमीटर लांबीचे 142 मोठे नाले यांचा समावेश आहे. या सगळ्या नाल्यातील  70 टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख संजय दराडे यांनी सांगितले.

तर 29 पुलांपैकी  23 पुलांचे काम सेफ कंडिशनमध्ये म्हणजे पुलाचा वापर ये – जा करण्यास होईल. तर पावसाळ्यात मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने 360 रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली असून त्यापैकी 80 टक्के कामे पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.हेही वाचा -

मधुमेह रुग्णांसाठी कोरोना धोकादायक, अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

पायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत
संबंधित विषय
Advertisement