Advertisement

बोगस डॉक्टरांपुढे डीएमईआर नरमले, कारवाईला वर्षभर स्थगिती


बोगस डॉक्टरांपुढे डीएमईआर नरमले, कारवाईला वर्षभर स्थगिती
SHARES

बोगस डॉक्टर शोधण्याच्या प्रक्रियेला राज्याच्या शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने सध्या स्थगिती दिली आहे. बोगस डॉक्टर ठरवण्यासाठी नेमकं कोणतं वर्ष निश्र्चित करावं? यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांवरील कारवाईला स्थगिती मिळाली आहे. शिवाय, या प्रक्रियेला राज्यातील डॉक्टरांनी विरोध केला होता. त्यामुळे आता ही कारवाई कशा पद्धतीने करावी? यावर चर्चा सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेणाऱ्या पण, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांना ‘बोगस’ ठरवण्याबाबतची प्रक्रिया सरकारने सुरू केली होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना राज्य सरकारसोबत ग्रामीण भागात सेवा देणं सक्तीचं केलं होतं. त्यासाठी एक वर्षाचा करार करावा लागतो. पण, डॉक्टर ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या अपुरी पडते आणि ग्रामीण जनतेला वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांविरद्ध कडक पाऊलं उचलत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.


वर्षांची मर्यादा निश्चित करण्याची मागणी

डीएमईआरच्या या निर्णयाला विरोध करत अनेक डॉक्टरांनी सरकारकडे पत्रव्यवहार केला. 'राज्य सरकार सरसकट सर्व डॉक्टरांना बोगस ठरवू शकत नाही. याकरता सरकारने वर्षाची मर्यादा निश्चित करावी' अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली. त्यानुसार, या मागणीवर वैद्यकीय शिक्षण संचलनालय विचार करत आहे. त्यामुळे वर्षभरासाठी बोगस डॉक्टरांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचं वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितलं.

काही डॉक्टरांनी खूप वर्षांपूर्वी आपली प्रॅक्टिस पूर्ण केली आहे. तर काहींनी नुकतीच पूर्ण केली आहे. जो ४० वर्षांपूर्वी डॉक्टर झाला आहे, त्याच्यावरही कारवाई करायची का? यावर पदवी घेऊनही नियमांनुसार ग्रामीण भागात बॉण्डसेवा पूर्ण केलेली नाही, अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत डॉक्टरांची नावनोंदणी करताना बंधपत्र मुक्त प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य केलं होतं. यासंदर्भात सर्व डॉक्टरांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.

डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय

त्यामुळे कुठल्या वर्षाच्या आधीच्या आणि नंतरच्या डॉक्टरांवर कारवाई करायची? हे अजून ठरायचं आहे. म्हणून कारवाई स्थगित केली असल्याचंही डॉ. शिनगारे यांनी स्पष्ट केलं आहे.हेही वाचा

तुमचा डॉक्टर कितवी शिकलाय? गोवंडीत ८वी पास बोगस डॉक्टरला अटक!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा