COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

तुमचा डॉक्टर कितवी शिकलाय? गोवंडीत ८वी पास बोगस डॉक्टरला अटक!


तुमचा डॉक्टर कितवी शिकलाय? गोवंडीत ८वी पास बोगस डॉक्टरला अटक!
SHARES

आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो. हा डॉक्टर आपल्याला बरं करेल याचा पूर्ण विश्वास आपल्याला असतो. तसा आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा टाकतो. पण, तो डॉक्टर खरंच आपल्या भरवशासाठी पात्र असतो का? किंवा तो खरंच डॉक्टर असतो का? आत्तापर्यंत कदाचित तुम्ही या गोष्टींचा विचार केला नसेल. पण आता तुम्हाला तो विचार करावा लागणार आहे. कारण, गोवंडीजवळच्या मानखुर्द परिसरातून पोलिसांनी तीन बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हे तिघे डॉक्टर होते फक्त ८वी, ११वी आणि १२वी पास!


पालिकेचा कारकून होण्याचीही पात्रता नाही!

गेल्या कित्येक वर्षांपासून हे तिघे बोगस डॉक्टर मानखुर्द परिसरात आपले दवाखाने उघडून बसले होते. बाहेरून यांचे दवाखाने रीतसर एमबीबीएस किंवा एमडी डॉक्टरसारखे होते. पण प्रत्यक्षात मात्र साधा पालिकेतला कारकून होण्याचीही शैक्षणिक पात्रता त्यांच्यात नव्हती.


अटक करण्यात आलेले बोगस

आरोपींची नावे
शैक्षणिक पात्रता
क्लिनिक
जहीर बशीर अहमद शेख
१२वी
क्रांती आयुर्वेदिक, कुर्ला
फरमनअली जाहीद हुसेन बेग
११वी
आचार्य मार्ग, चेंबुर
आसिफ हुसेन वली अहमद शेख
८ वी
अमर महल, चेंबुर


पदवी भलत्याचीच, डॉक्टरकी यांची!

पोलिसांनी केलेल्या तपासात आणखीन धक्कादायक बाब समोर आली आहे. हे तिघेही कुणाच्यातरी भलत्याच्याच पदवीवर आपली पोळी भाजून घेत होते! त्यामुळे आता आपल्या आसपासही असणारे डॉक्टर खरंच स्वत:च्याच पदवीवर काम करत आहेत का? हे तपासावं लागणार आहे.


प्रदीप जाधवचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोवंडी परिसरात रहाणाऱ्या २५ वर्षीय प्रदीप जाधव या तरूणाचा चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहबाज आलम मोहम्मद हारून सिद्दीकी या ३६ वर्षीय बोगस डॉक्टरला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी गोवंडी-मानखुर्द परिसरातल्या बोगस डॉक्टरांकडे आपला मोर्चा वळवला होता.


असा रचला सापळा...

नेहरूनगर, टिळकनगर, मानखुर्द आणि गोवंडी परिसरात बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चार पथकं या डॉक्टरांच्या मागावर लावण्यात आली. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोगस गिऱ्हाइक बनवून या डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आणि डॉक्टर बोगस असल्याची खात्री पटताच क्लिनिकवर छापे टाकण्यात आले.हेही वाचा

शर्टाच्या बाह्या वर केल्या म्हणून ओला चालकावर जीवघेणा हल्ला


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा