Advertisement

झोपेतून उठवलं म्हणून डॉक्टरने रुग्णाचं डोकं फोडलं!

डाॅक्टरांनी रागाच्या भरात सूर्यांशच्या डोक्याच्या उजव्या बाजूला हातातील टाॅर्च मारल्याचा आरोप सूर्यांशचे वडील मुकेशकुमार गुप्ता यांनी केला. यामुळे सूर्यांशच्या डोक्याला मोठी जखम झाली. परंतु डाॅक्टरांनी ही घटना लपवण्यासाठी सूर्यांशच्या डोक्याला ३ टाके घालण्याऐवजी केवळ एकच टाका घातल्याचा दावाही गुप्ता यांनी केला.

झोपेतून उठवलं म्हणून डॉक्टरने रुग्णाचं डोकं फोडलं!
SHARES

रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डाॅक्टरांना केलेल्या मारहाणीवरून जे.जे. रुग्णालयातील डाॅक्टरांच्या संपाला काही दिवस उलटत नाही, तोच सेंट जाॅर्ज रुग्णालयातील डाॅक्टरने झोप खराब केली म्हणून अवघ्या ६ वर्षांच्या रुग्णाचं डोकं टाॅर्च मारून फोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या रुग्णाच्या डोक्याला ३ टाके पडले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या निर्दयी डाॅक्टरचं नाव गौरव मौर्य असं आहे.


नेमकं काय घडलं ?

विक्रोळीत राहणाऱ्या सूर्यांश गुप्ता या ६ वर्षीय मुलाचे हातपाय थरथरायला लागल्याने त्याला ३ दिवसांपूर्वी सेंट जॉर्ज या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी रात्री पावणेनऊ वाजता आॅनड्युटी डोळ्याचे डाॅक्टर गौरव मौर्य त्याचे डोळे तपासण्यासाठी आले, परंतु सूर्यांश झोपलेला असल्याने डाॅक्टरांना त्याची तपासणी करता आली नाही.


अशा तऱ्हेने उठवलं...

पण, सूर्यांशच्या आईने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास डाॅ मौर्य यांना झोपेतून उठवून सूर्यांशला पुन्हा तपासण्याची विनंती केली. जेणेकरून त्यांना तपासणीचे रिपोर्ट्स मिळू शकतील. त्यानुसार हे आॅनड्युटी डाॅक्टर सूर्यांशला तपासायला गेल्यावर या वेळीही सूर्यांश झोपलेला आढळल्याने डाॅक्टरने त्याच्या डोक्यात टाॅर्च मारून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.


३ टाक्यांऐवजी एकच टाका

डाॅक्टरांनी रागाच्या भरात सूर्यांशच्या डोक्याच्या उजव्या बाजूला हातातील टाॅर्च मारल्याचा आरोप सूर्यांशचे वडील मुकेशकुमार गुप्ता यांनी केला. यामुळे सूर्यांशच्या डोक्याला मोठी जखम झाली. परंतु डाॅक्टरांनी ही घटना लपवण्यासाठी सूर्यांशच्या डोक्याला ३ टाके घालण्याऐवजी केवळ एकच टाका घातल्याचा दावाही गुप्ता यांनी केला.


तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ

हे प्रकरण आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी उघडकीस आणलं. या प्रकरणी सूर्यांशचे वडील एमआरए पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता, पोलिसांनी तक्रारीची नोंद करून न घेता केवळ ही घटना लिहून घेतली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंद करून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मागवून घेण्याची मागणी गुरव यांनी केली.

तर, ''रुग्णाच्या नातेवाईकांपैकी कुणीही आमच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेलं नाही. आम्ही स्वत: जाऊन रुग्णाच्या आई-वडिलांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी याप्रकरणी आम्हाला कुणाविरोधातही तक्रार करायची नसल्याचं सांगितलं'', असं माता रमाबाई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखलाल वर्ते यांनी सांगितलं.


घडलेल्या घटनेविषयी रुग्णालय प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली होती. पण, नंतर डॉक्टरांनी घडलेल्या प्रसंगाबाबत माफी मागितली. शिवाय, पोलिसांनी याप्रकरणी फक्त एपीआर लिहून घेतलाय. अजून एफआयआर दाखल झालेली नाही.
- मुकेशकुमार गुप्ता, सूर्यांशचे वडील

पण एमआरए पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची कुठलीही तक्रार पोलिस स्टेशनमध्ये आलेली नाही.


हेही वाचा-

हुश्श... ४ दिवसांनंतर जे.जे.तील निवासी डाॅक्टरांचा संप मागेRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा