Advertisement

हुश्श... ४ दिवसांनंतर जे.जे.तील निवासी डाॅक्टरांचा संप मागे

वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासह अन्य मागण्यांबाबत लेखी आश्वासन यावेळी देण्यात आलं आणि मार्डनं संप मागे घेतला. संप मागे घेण्यात आल्यानं आता निवासी डाॅक्टर लवकरच कामावर रूजू होतील. संपाच्या काळात रूग्णांचे मोठे हाल झाले. संप मिटल्यानं रूग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

हुश्श... ४ दिवसांनंतर जे.जे.तील निवासी डाॅक्टरांचा संप मागे
SHARES

गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेला जे. जे. रूग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप अखेर मंगळवारी सायंकाळी मागे घेण्यात आला. वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या मुख्य मागणीसह निवासी डाॅक्टरांच्या अन्य मागण्यांबाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर मार्ड(मेडिकल असोसिएशन आॅफ रेसिडेंट डॉक्टर्स)नं संप मागे घेतल्याचं जाहीर केलं.


कधीपासून संप?

शनिवारी सकाळी जे. जे. रूग्णालयातील सर्जरी विभागात एका रूग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ करत २ निवासी डाॅक्टरांना बेदम मारहाण करत रूग्णालयाचं मोठं नुकसान केलं. या मारहाणीत एका महिला निवासी डाॅक्टराचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर लागलीच जे. जे. रूग्णालयातील ४०० निवासी डाॅक्टर संपावर गेले. संप निकाली काढण्यासाठी प्रशासनासह राज्य सरकार गेल्या ४ दिवसांपासून प्रयत्न करत होते.


जोर बैठकांना यश

बैठकांवर बैठका करत मार्डचं मन वळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. पण वाॅर्डमध्ये तात्काळ सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या मागणीवर मार्ड ठाम होतं. त्यामुळेच बैठका निष्फळ ठरल्या नि संप ४ दिवस खेचला गेला. अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी मार्ड आणि प्रशासनाशी चर्चा करत यावर तोडगा काढला.


लेखी आश्वासन

वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासह अन्य मागण्यांबाबत लेखी आश्वासन यावेळी देण्यात आलं आणि मार्डनं संप मागे घेतला. संप मागे घेण्यात आल्यानं आता निवासी डाॅक्टर लवकरच कामावर रूजू होतील. संपाच्या काळात रूग्णांचे मोठे हाल झाले. संप मिटल्यानं रूग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


मान्य झालेल्या मागण्या 'अशा'

  • २८ ठिकाणी तात्काळ सुरक्षा रक्षक तैनात करणार
  • डाॅक्टरांसाठी अर्लाम सिस्टिम रूग्णालयात लावण्यात येणार
  • औषधांची कमतरता यापुढे भासणार नाही
  • मारहाण करणाऱ्या दोषींवर कारवाई करणार



हेही वाचा-

जे.जे. रुग्णालयात २ निवासी डॉक्टरांना मारहाण

एमएसआरडीसी कार्यालयात राडा, अधिकाऱ्यांना मारहाण, शाईफेक



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा