Advertisement

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच


प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच
SHARES

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर १३ तारखेपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मुंबईसह बाकी अन्य जिल्ह्यात या संपाचे पडसाद अाता दिसत आहेत.  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा शुक्रवारी तिसरा दिवस संपत आला तरीही प्रशासनाने त्यांना सकारात्मक उत्तर दिलेलं नाही. वेतनवाढीसाठी हा संप पुकारण्यात अाला अाहे.

वेतनवाढीसाठी संप

वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना किमान एक सेमिस्टर इंटर्नशीप करावी लागते. ही पेड इंटर्नशीप असते. या इंटर्नशीपमध्ये महाराष्ट्र सोडून बाकी सर्व राज्यात १५ हजारपेक्षा जास्त वेतन दिलं जातं. महाराष्ट्रात फक्त ६ हजार रुपये वेतन मिळतं.  बाकी राज्याच्या तुलनेत वेतन मिळावं, या मागणीसाठी हे विद्यार्थी संपावर गेले अाहेत. 

१२ जून रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटना आणि प्रशासनाची बैठक झाली होती.  पण त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने इंटर्न डॉक्टरांनी संप सुरु केला. आपल्या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत आणि याची ग्वाही लिखित स्वरूपात मिळत नाही तोवर हे आंदोलन असंच चालू राहील,  असं प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटनेचे सेक्रेटरी डॉ. गोकुळ राख यांनी सांगितलं.



हेही वाचा -

रक्त संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल

वन रूपी क्लिनिक अडचणीत, कुर्ला, घाटकोपरचे क्लिनिक बंद करण्याचे आदेश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा