तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी किती घातक आहे? याचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी देशभरातील ४५३ तज्ज्ञ डॉक्टर आणि १० नामांकित वैद्यकीय संस्थांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या डॉक्टरांनी 'तंबाखूच्या पाकिटावर सावधगिरी बाळगणाऱ्या जाहिरातीला जास्त जागा द्या', अशा मागणीचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलं आहे.
सिगारेटच्या पाकिटावर एकूण जागेच्या ८५ टक्के भाग हा कर्करोगाचा धोका असा इशारा देणारा असावा, अशी विनंती करण्यासाठी देशभरातील ४५३ तज्ज्ञ डॉक्टर आणि १० नामांकित वैद्यकीय संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर छापण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात देशभरातील कर्करोगतज्ज्ञांनी पंतप्रधानांना पत्र लिहून जाहिरातींचा आकार हा ८५ टक्केच असावा असं या पत्रात नमूद केलं आहे.
सिगारेटच्या पाकीटांवर एकूण जागेच्या ८५ टक्के भागात सिगारेटचे दुष्परिणाम दाखवणाऱ्या जाहिरातीवर कर्नाटक हायकोर्टाने बंधन आणलं आणि केंद्राचा असलेला कायदा रद्द केला. त्यामुळे देशात सुरू असणाऱ्या तंबाखूविरोधी अभियानाला त्याचा फटका बसेल, असं म्हणत डॉक्टरांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर जाहिरातींचा आकार वाढवा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं सुद्धा सिगारेटच्या पाकिटावरील ८५ टक्के जागेत कर्करोगाच्या जाहिरातीला बंधनकारक केलं आहे. पण, आता कर्नाटक उच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द करत ४० टक्के जागेवर जाहिरातीला मान्यता होती, तोच निर्णय कायम ठेवत या याचिकेवरील सुनावणी सर्वाच्च न्यायालयाकडे वर्ग केली आहे.
तंबाखूनजन्य पदार्थांच्या पॉकेट्सवर छापलेल्या चेतावण्यांमुळे लोकांना होणाऱ्या कर्करोगाबद्दल योग्य माहिती मिळते. चित्रात दाखवलेल्या स्थितीपेक्षाही गंभीर बिकट स्थितीत असलेले रुग्ण आमच्याकडे उपचारांसाठी येतात. टाटा रुग्णालयात दररोज १൦ ते १५ रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे येतात. त्यातील अनेकांचा ३ ते ६ महिन्यांतच मृत्यू होतो. दरवर्षी ८൦ ते ९൦ टक्के मुख कॅन्सर झालेले रुग्ण असतात. त्यापैकी ५൦ टक्के रुग्णांचा उपचारानंतर १२ महिन्यांतच मृत्यू होतो.”
- डॉ. पकंज चतुर्वेदी, डोकं आणि मानेचे कर्करोग तज्ज्ञ, टाटा मेमोरिअल रुग्णालय
डॉ. चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, तंबाखूचं व्यसन हे एकमेव असं कारण आहे ज्यामुळे मृत्यूला थांबवता येऊ शकते. एकट्या भारतात, २६७ दशलक्ष लोक तंबाखू आणि तंबाखू उत्पादनांचा वापर करतात आणि त्यांपैकी एक तृतीयांश लोकांचा मृत्यू होतो. भारतात, ५५൦൦ मुले तंबाखू खाण्यास सुरुवात करतात आणि ज्या वेळेस त्यांना धोक्याची जाणीव होते तोपर्यंत ते व्यसनाधीन झालेले असतात.
तंबाखू सेवनामुळे भारतात आजवर १൦ लाखांपेक्षा जास्त रुग्ण मृत पावले आहेत. पॅकेट्सवर असणारी चेतावणी छायाचित्रे साक्षर नसलेल्या व्यक्तीला योग्य संदेश देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेल्दी भारत हे स्वप्न आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं पकिटावर ८५ टक्के जाहीरात असायला हवी, यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे.
- प्रदीप माथूर, ट्रस्टी, संबंध हेल्थ फाऊंडेशन