Advertisement

महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर

रुग्ण महिला चेंबूरमध्ये राहणाऱ्या आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या ओटीपोटीत तीव्र वेदना जाणवत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी दुखण्याकडं दुर्लक्ष केलं.

महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर
SHARES

मुंबईतील एका ५५ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ११ किलोचा ट्यूमर काढण्यात आला आहे. नऊ तास शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांना महिलेच्या पोटातून ट्यूमर काढण्यास यश आलं आहे. चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. या महिलेला पोटाचे आजार होत असल्याने तपासणी केली असता पोटामध्ये ट्यूमर असल्याचं आढळून आलं होतं.

या रूग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तनवीर अब्दुल माजीद या नेतृत्वाखाली युरोलॉजिस्ट डॉ. संतोष पालकर आणि भूलतज्ज्ञ डॉ. शिल्पा देशमुख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

रुग्ण महिला चेंबूरमध्ये राहणाऱ्या आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या ओटीपोटीत तीव्र वेदना जाणवत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी दुखण्याकडं दुर्लक्ष केलं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने झेन रूग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी महिलेची अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन चाचणी करण्यात आली. या चाचणीत पोटात मोठी गाठ असल्याचं दिसून आलं. निदान झाले. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा ट्यूमर काढला आहे.

याबाबत रूग्णालयातील डॉ. तन्वीर अब्दुल माजीद म्हणाले की, महिलेच्या मूत्रपिंड, लहान आतडे आणि यकृतापर्य़ंत हा ट्यूमर पसरला होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं गरजेचं होते. साधारणतः ११ किलो वजनाचा हा ट्यूमर होता. ही शस्त्रक्रिया नऊ तास सुरू होती. आता महिलेची प्रकृती उत्तम असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.



हेही वाचा -
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू 
मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा