Advertisement

महिलेच्या पोटातून काढली १० किलोची गाठ

हार्मोनचं असंतुलन, कर्करोग किंवा अनुवांशिकतेमुळं महिलांमध्ये ट्युमर होऊ शकतो. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे भारतात महिलांमधील शारीरिक समस्यांचं प्रमाण ६० टक्क्यांनी वाढलं आहे. महिलांमध्ये ओव्हरी, अंडाशय, गर्भाशय, स्तन या अवयवांमध्ये ट्युमर होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच उपचार केले नाही, तर महिला दगावण्याचाही धोका अधिक असतो.

महिलेच्या पोटातून काढली १० किलोची गाठ
SHARES

मागील ५ महिन्यांपासून पोटदुखीनं त्रस्त असलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या अंडाशयातून तब्ब्ल १० किलोची गाठ काढण्यात मुंबईतील कामा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलं आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं अाहे.


किरकोळ दुखणं म्हणून दुर्लक्ष 

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथं शेती करणाऱ्या शकुंतला मोरे यांच्या पोटात गेल्या ५ महिन्यांपासून दुखत होतं. किरकोळ दुखणं म्हणून त्यांनी सुरूवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, पोटाचा आकार वाढू लागल्याने त्यांची चिंता वाढली. वाढलेल्या पोटामुळे शेतात काम करणं त्यांना अशक्य होऊ लागलं. काही दिवसांनी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी स्थानिक दवाखान्यात धाव घेतली. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या पोटात अतिरिक्त मांस असल्याचं सांगून त्यांना काही औषधं दिली. पण या औषधांचा काहीच फरक न पडल्याने त्यांनी उपचारासाठी मुंबईत येण्याचं ठरवलं.


चाचण्यांनंतर ट्युमरचं निदान

मुंबईत आल्यावर त्या सुरूवातीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल झाल्या. पण येथील डॉक्टरांनाही शकुंतला यांना नेमका कोणता आजार अाहे हे सांगता अालं नाही. शकुंतला अखेर २० जुलै रोजी आपल्या मुलासोबत कामा रुग्णालयात अाल्या. यावेळी त्यांच्या सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांना अगोदर ही कर्करोगाची गाठ असल्याचा संशय आला. मात्र, चाचण्यांनंतर ही कर्करोगाची गाठ नसून अंडाशयात ट्युमर असल्याचं समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. किचकट अशी ही शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आणि त्यांच्या पोटातून १० किलोची गाठ काढण्यात आली.


हार्मोनचं असंतुलन, 

हार्मोनचं असंतुलन, कर्करोग किंवा अनुवांशिकतेमुळं महिलांमध्ये ट्युमर होऊ शकतो. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे भारतात महिलांमधील शारीरिक समस्यांचं प्रमाण ६० टक्क्यांनी वाढलं आहे. महिलांमध्ये ओव्हरी, अंडाशय, गर्भाशय, स्तन या अवयवांमध्ये ट्युमर होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच उपचार केले नाही, तर महिला दगावण्याचाही धोका अधिक असतो.मांस आणि पाण्याने भरलेली ही गाठ १० किलोची होती. हा ट्युमर इतका पसरला होता की, तो वाढला असता किंवा फुटला असता, तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. शस्त्रक्रियेदरम्यानही गाठ फुटली असती, तर रुग्णाच्या जीवावर बेतलं असतं. पण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.  
- डॉ. राजश्री कटके,  वैद्यकीय अधिक्षक, कामा रुग्णालयपोटातील गाठीमुळं मला रोजची कामं करता येत नव्हती. खूप औषधे आणि दवाखाने करूनदेखील काहीच फरक पडला नाही. कामा रुग्णालयातील या शस्त्रक्रियेनंतर मला नवीन जन्म मिळाला आहे.
- शकुंतला मोरे, रुग्ण हेही वाचा -

इंडियन मेडिकल असोसीएशनचे डॉक्टर संपावर

बाटलीबंद पाण्यात अाढळले जीवघेणे जीवाणू
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा