दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचं रजा आंदोलन सुरू

  मुंबई  -  

  मुंबई - डॉक्टरांना होणाऱ्या मारहाण प्रकरणी सोमवारपासून निषेध व्यक्त करत डॉक्टरांनी रजा आंदोलन सुरू केलं आहे. सायन रुग्णालय तसंच राज्यातील इतर रुग्णालयात डॉक्टरांना नातेवाईकांकडून मारहाण होण्याची काही प्रकरणं समोर आली होती. त्याविरोधात राज्यातील आणि मुंबईतील निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. 

  संपूर्ण सुरक्षा, रुग्णालयात सीसीटीव्ही यांसारख्या सुविधा मिळत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं सायनमधील एका निवासी डॉक्टरने सांगितलंय. हा संप डॉक्टर विरूद्ध रुग्ण असा नाही तर आम्ही आमच्या हक्कांसाठी हा रजा संप केला असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी या वेळी दिली. तर, फक्त इमर्जन्सी रुग्णांना उपचार देत असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.