Advertisement

डाॅक्युमेंट्रीतून पॅथाॅलाॅजिस्टचं प्रबोधन


डाॅक्युमेंट्रीतून पॅथाॅलाॅजिस्टचं प्रबोधन
SHARES

रुग्णांच्या आजाराचं अचूक निदान करणारा आरोग्य सेवेतील सर्वात महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे पॅथॉलॉजिस्ट तसेच पॅथॉलॉजी. पण सध्या महाराष्ट्रात बोगस पॅथाॅलाॅजिस्टचं प्रमाण वाढल्याने त्याचा रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायॉलॉजिस्टतर्फे पॅथॉलॉजीवर आधारीत पहिल्या डाॅक्युमेंट्रीचं स्क्रिनिंग करण्यात आलं.  


डाॅक्युमेंट्रीत नेमकं काय?

या डाॅक्युमेंट्रीतून पॅथॉलॉजीचा इतिहास, पॅथॉलॉजिस्ट म्हणजे काय? त्याचं काम काय? त्यांचं महत्त्व आणि त्यांच्या कामाच्या परिसीमा या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सध्या महाराष्ट्रात बोगस पॅथॉलॉजिस्टचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसंच बेकायदेशीर लॅबद्वारे सर्वसामान्यांची आर्थिक लूटही होत आहे. विनाकारण रक्ताच्या चाचण्या करण्याचा प्रकारही वाढला आहे. जाहिरातींद्वारे रुग्णांना चाचण्या करण्यास भाग पाडलं जात असल्याचे प्रकारही बऱ्याचदा समोर आले आहेत. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं असं मत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅन्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी व्यक्त केलं.


बोगस पॅथॉलॉजिस्टसाठी अनेक नियम आणि कायदे आहेत. पण, ते पाळले जात नाहीत आणि त्यांची अंमलबजावणी देखील होत नाही. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. एखाद्या रुग्णाच्या आजाराचं चुकीचं निदान हे त्याच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा लॅब चालवणाऱ्यांना बोगस पॅथॉलॉजिस्टवर कारवाई झाली पाहिजे. 

-  डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅन्ड मायक्रोबायोलॉजिस्ट


चर्चेतले काही मुद्दे-

  • पॅरामेडिकल काऊन्सिलमध्ये नोंदणी म्हणजे पॅथॉलॉजी केंद्र उघडण्याची परवानगी नाही
  • डॉक्टरांनी रुग्णांना योग्य सल्ला दिला पाहिजे, त्याच्या गरजेपुरत्याच तपासण्या केल्या पाहिजेत. त्याही योग्य आणि कायदेशीर लॅबमधूनच
  • पॅथॉलॉजिस्टनी स्वत: हजर राहून चाचण्यांचे रिपोर्ट बनवले पाहिजेत
  • तंत्रज्ञानी योग्य प्रशिक्षण घेऊन पॅथॉलॉजिस्टनी ठरवून दिलेल्या कार्यप्रणालीप्रमाणे काम केली पाहिजेत
  • बेकायदेशी लॅब चालकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली पाहिजे



हेही वाचा-

वर्ल्ड पॅथॉलॉजिस्ट डे स्पेशल - पॅथॉलॉजिस्टही डॉक्टर असतो!

तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारची हेल्पलाईन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा