Advertisement

वर्ल्ड पॅथॉलॉजिस्ट डे स्पेशल - पॅथॉलॉजिस्टही डॉक्टर असतो!


वर्ल्ड पॅथॉलॉजिस्ट डे स्पेशल - पॅथॉलॉजिस्टही डॉक्टर असतो!
SHARES

एखाद्या आजाराचं निदान करायचं झाल्यास आपल्याला पहिल्यांदा पॅथॉलॉजिस्ट तज्ज्ञांची गरज पडते. कारण, त्यांच्याशिवाय आपल्या आजाराचं अचूक निदान होऊ शकत नाही. खरंतर, पॅथॉलॉजिस्ट हा आरोग्य सेवेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जगभरात १५ नोव्हेंबर हा 'जागतिक पॅथॉलॉजी दिन' म्हणून साजरा केला जातो.


कोण असतात पॅथॉलॉजिस्ट?

  • पॅथॉलॉजिस्ट तो असतो, ज्याची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे असते
  • ज्याच्याकडे सुपरविजन करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता असते
  • योग्य कार्यपद्धतीनुसारच तो काम करतो
  • एखाद्या रुग्णाच्या रिपोर्टचं अचूक निदान करतो
  • आकडेवारीत आलेला रिपोर्ट डॉक्टरांना रुपांतरीत करून देणं, हे ही काम पॅथॉलॉजिस्ट करतो


टेक्निशियनही समजतात स्वत:ला पॅथॉलॉजिस्ट

टेक्निशियनला वैद्यकीय ज्ञान नसते. तरी बऱ्याचदा टेक्निशियनही स्वत:ला पॅथॉलॉजिस्ट समजतात. पण, पॅथॉलॉजिस्टला आरोग्य सेवेत वैद्यकीय ज्ञान असणं गरजेचं असतं. डॉक्टरांनी आजाराचं निदान करण्यासाठी विविध चाचण्या करायला सांगितल्या की त्या पॅथॉलॉजिस्टच्याच माध्यमातून केल्या जातात.


पहिल्यांदा पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टर असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याने जरी उपचार नाही केले, तरी त्याला आजाराचं अचूक निदान करता येतं. वैद्यकीय क्षेत्रात जो गोळ्या आणि औषधं देईल त्याला डॉक्टर असं संबोधलं जातं. पण, जर आजाराचं खरं कारण आणि अचूक निदान हवं असेल, तर पॅथॉलॉजिस्ट ही त्या रुग्णाच्या औषधोपचाराची पहिली पायरी असते.

डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट्स अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट्स


जागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त माहितीपटाचं स्क्रिनिंग

जागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त बुधवारी एका माहितीपटाचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ज्यात पॅथॉलॉजिस्ट म्हणजे काय? आणि बोगस पॅथॉलॉजिस्टला कसं ओळखावं? हे मांडण्यात आलं आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेनं हा माहितीपट बनवला आहे. ‘कथा आपल्या आरोग्याची' (स्टोरी ऑफ द पब्लिक हेल्थ) असं त्याचं नाव आहे.



हेही वाचा

तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारची हेल्पलाईन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा