Advertisement

कल्याण-डोंबिवलीत रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. येथील एकूण रुग्ण संख्या आता ३७ हजारांच्या वर गेली आहे.

कल्याण-डोंबिवलीत रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. येथील एकूण रुग्ण संख्या आता ३७ हजारांच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ७५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यू दर २.०३ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर गेला आहे


सध्या कल्याण-डोंबिवलीत ५३१८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ३१,१७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. येथील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४ टक्के आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात धुरीकरण, फवारणी, निर्जंतुकीकरण मोहीम व्यापकपणे राबवली जात आहे.  पालिकेच्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण, फिवर क्लिनिक, आय.एम.ए.चे डॉक्टर आर्मी, फॅमिली डॉक्टर कोविड फायटर आदींच्या माध्यमातून कोरोना चाचण्यांवर भर दिला आहे. 


पालिका क्षेत्रात आतापर्यंत आरटीपीसीआरच्या ७६ हजार ९८४ चाचण्या झाल्या असून यातील २२ हजार ५२ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ३१ हजार ९१४ अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून १४ हजार ६१६ रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या शास्त्रीनगर, सावळाराम महाराज महत्रे क्रीडा संकुल, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, आसरा फाउंडेशन स्कूल, वसंत व्हॅली आदी ठिकाणी ९६८ ऑक्सिजन तर ३४० आय.सी.यु, बेड्स, १२५ व्हेंटीलेटर तसेच खाजगी २६ रुग्णालयात ९०५ ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. तर टाटा आमंत्रा येथे २४३८, साई निर्वाणा येथे ६३६, शक्तीधाम येथे १७० तर डोंबिवली इंदिरानगर येथे १०० बेड्सचे विलगीकरण केंद्र सुरु आहे.हेही वाचा -

कोरोनाने १० दिवसांत 'इतक्या' ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

जम्बो कोरोना केंद्रांत 'या' मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर देणार सेवा


Read this story in हिंदी
संबंधित विषय