Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २३८ दिवसांवर

मुंबईतील रुग्णवाढीचं प्रमाण वाढल्याने कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. हा कालावधी आता २३८ दिवसांवर आला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २३८ दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच चालली आहे.  मागील तीन दिवसांपासून १ हजाराच्या वर नवीन रूग्ण आढळत आहेत. गुरूवारी मुंबईत कोरोनाचे नवीन  ११०३ रुग्ण आढळले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचं प्रमाण वाढल्याने कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. हा कालावधी आता २३८ दिवसांवर आला आहे. म्हणजे आज असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी २३८ दिवसांचा कालावधी लागू शकतो. 

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख २९ हजार ८४३ झाला आहे. तर आतापर्यंत ११ हजार ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९३ टक्क्यांवर आहे. वेळीच होणाऱ्या करोना चाचण्यांमुळे तो वाढता ठेवण्यात यश आलं आहेत. मुंबईत ३३ लाख ५३ हजार १२४ कोरोना चाचण्या 

सध्या मुंबईत १४ कंटेनमेंट झोन आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत. या झोनमधल्या १८५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा