Advertisement

नवी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २६५ दिवसांवर

नवी मुंबईतील घटत असलेली कोरोना रुग्ण संख्या आता दिवाळीनंतर पुन्हा वाढली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही घटून २६५ दिवसांवर आला आहे.

नवी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २६५ दिवसांवर
SHARES

नवी मुंबईतील घटत असलेली कोरोना रुग्ण संख्या आता दिवाळीनंतर पुन्हा वाढली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही घटून २६५ दिवसांवर आला आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३५२ दिवस होता. रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोराना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे.

दिवाळीमध्ये अनेक नागरिक बाहेर पडले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली.  दिवसाला नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा ३ अंकांवर आली आहे.  काही दिवस रोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा १०० च्या खाली आला होता. आता रोज १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. 

रुग्ण दुपटीचा कालावधीही घटला आहे. ११ नोव्हेंबरला हा कालावधी ३५२ दिवसांवर होता. तो आता २६५ दिवस झाला आहे. नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन १२१ रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,३७० झाली आहे.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४,९७३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९६४ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १४३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 


हेही वाचा -

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीएRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement