Advertisement

एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण
SHARES

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती चांगली असून संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांना याआधीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खडसे यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी मुंबईत बोलावले असता खडसे यांची पुन्हा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला. गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी अशी विनंती रक्षा खडसे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे या दोन कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.



हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा