Advertisement

व्हिटॅमिनच्या जागी दिलं कॅन्सरचं औषध, विक्रेत्याचा परवाना रद्द

दोषी औषध विक्रेत्याचा औषध विक्री परवाना अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने रद्द केला होता. पण औषध विक्रेत्याने 'स्टे' मिळवत औषध विक्री सुरूच ठेवली होती. अखेर याप्रकरणी 'मुंबई लाइव्ह'ने वृत्त प्रसिद्ध करताच अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी 'स्टे' हटवत औषध विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

व्हिटॅमिनच्या जागी दिलं कॅन्सरचं औषध, विक्रेत्याचा परवाना रद्द
SHARES

व्हिटामिनच्या औषधाच्या जागी रुग्णाला चक्क कॅन्सरचं औषध दिल्याने गेल्या वर्षी मालाडमधील दिगंबर धुरी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी औषध विक्रेत्याचा औषध विक्री परवाना अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने रद्द केला होता. पण औषध विक्रेत्याने 'स्टे' मिळवत औषध विक्री सुरूच ठेवली होती. अखेर याप्रकरणी 'मुंबई लाइव्ह'ने वृत्त प्रसिद्ध करताच अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी 'स्टे' हटवत औषध विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.


कसं दिली चुकीचं औषध?

डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन धुरी मालाड येथील कल्पेश मेडिकल स्टोअर्समध्ये गेले असता त्यांना व्हिटॅमिनच्या गोळ्यांऐवजी विक्रेत्याने कॅन्सरची गोळी दिली. Folimax 10 या औषधाऐवजी folitrax 10 हे औषध देण्यात अालं. M आणि R या फरकामुळे व्हिटॅमिनच्या जागी कॅन्सरच औषध धुरींना देण्यात आलं.


चुकीने जादा डोस

हे औषध कॅन्सर रुग्णांनी आठवड्यातून एकदा घ्यायला हवं, असं असताना डाॅक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे धुरी यांनी व्हिटामिनच्या गोळ्या समजून हे औषध दिवसातून दोनदा असं सलग ५ दिवस घेतलं. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.


मंत्र्यांकडे दाद

या प्रकरणाची 'एफडीए'ने सखोल चौकशी करत औषध विक्रेत्याला दोषी ठरवलं. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटकही केली होती. मार्च महिन्यात 'एफडीए'ने औषध विक्रेत्याचा औषध विक्रीचा परवानाही रद्द केला. मात्र नियमानुसार 'एफडीए'च्या निर्णयाविरोधात औषध विक्रेत्याने मंत्र्याकडे दाद मागत या निर्णयावर 'स्टे' मिळवला.


सुनावणीत निर्णय

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आणि सर्व चौकशीअंती विक्रेता दोषी ठरल्याने अखेर कारवाईवरील 'स्टे' उठवत औषध विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत मंत्र्यांनी त्याचा परवाना रद्द केला. महत्वाचं म्हणजे यावेळी औषध दुकानात फार्मसिस्ट नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून अन्य नियमाचं उल्लंघनही विक्रेत्याने केल्याचं स्पष्ट झालं आहे.



हेही वाचा-

सावधान...देशात वाढत चालला आहे कर्करोग!

औषधं खरेदी करताय? मग सावधान.. हे नक्की वाचा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा