नौदलासह पालिका रुग्णालयातून मुदतबाह्य औषधं जप्त

  Pali Hill
  नौदलासह पालिका रुग्णालयातून मुदतबाह्य औषधं जप्त
  मुंबई  -  

  मुंबई - कायदा धाब्यावर बसवत मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयासह पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांची जीवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) नुकत्याच घातलेल्या छाप्यात कुलाबा येथील नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी नेव्ही रुग्णालयात 16,640 रुपये किंमतीची मुदतबाह्य औषधे आढळली. औषधं जमिनीवर कुठेही-कशीही ठेवल्याचं, वापरलेल्या औषधांची नोंदच नसल्याचं, तसंच औषधांच्या साठ्यासाठी योग्य ते तापमान न राखल्याचंही स्पष्ट झालंय.

  गोरेगावमधील पालिकेच्या सिद्धार्थ रूग्णालयातही औषधे जमिनीवरच ठेवलेली होती. 800 रुग्णांसाठी एकच फार्मासिस्ट असून औषध वितरणाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचंही स्पष्ट झालं. मुंबईच नव्हे तर ठाणे, नाशिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयांवरही एफडीएने छापे घातले. या सर्व ठिकाणीही कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं उघड झालं. छापे टाकलेल्या अकरा ठिकाणांहून औषधांचे 14 नमुने जप्त करून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवण्याची मागणी फार्मसिस्ट संघटना आणि औषध विक्रेत्यांनी केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.