अन्न पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांनो सावधान

  Pali Hill
  अन्न पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांनो सावधान
  मुंबई  -  

  मुंबई - अन्न पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांनो सावधान... जर तुम्ही अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)चा परवाना आणि नोंदणी न करता अन्न पदार्थांची वाहतूक करत असाल, तर असं करणं यापुढे तुम्हाला चांगलेच महागात पडेल. कारण, जर तुमच्याकडे नोंदणी वा परवाना नसेल तर तुरुंगवास भोगावा लागेलच, पण त्याचबरोबर एक ते पाच लाखांचा दंडही सोसावा लागेल.

  अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न वाहतूक ही अन्न व्यवसायात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार अन्न वाहतूक करणाऱ्या वाहनांना एफडीएची नोंदणी-परवाना बंधनकारक आहे. 2011 पासून हा कायदा लागू झाला आहे, पण या कायद्याची कडक अंमलबजावणीच होत नसल्याने वाहतुकदार परवाना-नोंदणी न घेताच वाहतूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता एफडीएच्या ठाणे विभागाने या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यापाठोपाठ आता मुंबईसह राज्यातही या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

  12 लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या वाहनांतून विना परवाना-नोंदणी अन्न वाहतूक होत असेल तर एक लाखांपर्यंतचा दंड. 12 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असेल आणि विना नोंदणी-परवाना वाहतूक होत असेल तर पाच लाखांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा.
  त्वरीत नोंदणी आणि परवाना घेण्याचे एफडीएचे आश्वासन. www.fssai.gov.in या संकेतस्थळावरून घर बसल्या ऑनलाईन नोंदणी करा, परवाना घ्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.