Advertisement

सेंट जाॅर्जेसमध्ये पार पडली पहिली 'मिरर हँड सर्जरी'


सेंट जाॅर्जेसमध्ये पार पडली पहिली 'मिरर हँड सर्जरी'
SHARES

मुंबईतील सेंट जाॅर्जेस रुग्णालयात पहिल्यांदाच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ललितकुमार साळवे यांच्यावर लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेनंतर नुकतीच ९ महिन्यांच्या बाळावर  'मिरर हँड सर्जरी' करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.


नऊ महिन्यांचं स्पेशल चाईल्ड

उत्तर प्रदेशातील एक छोट्याशा गावात अहमद शेख राहत अाहेत. अहमद यांना नऊ महिन्यांपूर्वी मुलगा झाला. वैद्यकीय उपचार आणि पुरेशा माहितीच्या अभावामुळे त्यांना आपल्या बाळामध्ये असलेल्या त्रुटींचा पत्ता लागला नाही. बाळ जन्मल्यानंतर ते शारीरिक दृष्ट्या अविकसित असल्याचं समजलं. एशाद अहमद शेख या नऊ महिन्यांच्या बाळाच्या हाताची विचित्रपणे वाढ झाली होती. अहमद यांनी मुंबईतील सेंट जोर्जेस रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलाला नेमकं काय झालं आहे ते त्या माता - पित्यांना माहीत नव्हतं.


 'मिरर हँड ' म्हणजे काय

सेंट जाॅर्जेस रुग्णालयात एशादला दाखल केल्यानंतर त्याला 'मिरर हँड' असल्याचं समजलं.  'मिरर हँड' म्हणजे जसं आरशात आपलं प्रतिबिंब जसंच्या तसं दिसतं अगदी त्याचप्रमाणे आपल्या हाताची बोटे दुप्पटीने असतात.  परंतू हाताला अंगठा नसतो. 'मिरर हँड' असलेल्या रुग्णाच्या एकाच हाताला तब्बल आठ बोटं असतात.


डाॅ. रजत कपूर यांच्या मागदर्शनाखाली 

काही दिवसांपूर्वी सेंट जाॅर्जेेस रुग्णालयात बीड जिल्ह्यातील महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेवर लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली. सेंट जाॅर्जेसची ही  लिंग परिवर्तनाची पहिलीच शस्त्रक्रिया असून ती प्लास्टिक सर्जन डाॅ. रजत कपूर यांच्या मागदर्शनाखाली झाली. नऊ महिन्यांच्या एशाद या बाळावर नुकतीच  'मिरर हँड सर्जरी' यशस्वीरित्या पार पडली. या रुग्णालयाची अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे आणि ही शस्त्रक्रियादेखील डॉ. कपूर यांनी केली


दुर्मिळ आजार 

प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांनी 'मुंबई लाईव्ह' ला सांगितलं की," जगभरात मिरर हँडच्या एकूण ५० ते ६० केसेस आहेत. हा आजार जितका दुर्मिळ आहे तितकंच त्यावर उपचार करणं देखील कठीण आहे. मुंबई सारख्या शहरात यावर उपचार होणं शक्य झालं आणि त्यामुळे आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया करू शकलो. एशादच्या डाव्या हातावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची अतिरीक्त बोटे काढून कृत्रिम अंगठा बसवण्यात आला आहे. 

 सेंट जाॅर्जेसचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड म्हणाले,  आता बाळाची प्रकृती स्थिर आहे. त्याची जखम बरी झाल्यानंतर पुढे काय करता येईल यावर निर्णय घेणार आहोत.


लिंग परिवर्तन विभाग

ललिता म्हणजेच ललितकुमार साळवे यांच्या शस्त्रक्रियेनंतर सेंट जोर्जेस रुग्णालयात लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळे डॉ मधुकर गायकवाड, डाॅ. रजत कपूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष विभाग सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या विभागात लिंग परिवर्तन चाचणी, सर्जरी, कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचे उपविभाग असतील. डॉ रजत कपूर या विभागाचे प्रमुख असणार आहेत.



हेही वाचा - 

शिक्षण एमबीबीएस.... पण पगार सहा हजार रुपये; डॉक्टर्स डे स्पेशल

रुग्णांनो, टेन्शन नाॅट, शस्त्रक्रियेचा खर्च 'असा' येणार नियंत्रणात!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा