Advertisement

नवी मुंबईत पहिले पोस्ट कोविड 'रिकव्हरी क्लिनिक' सुरु

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलने कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या, परंतु अजूनही या आजाराचा काही प्रमाणात त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी खास ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू केलं आहे.

नवी मुंबईत पहिले पोस्ट कोविड 'रिकव्हरी क्लिनिक' सुरु
SHARES

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलने कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या, परंतु अजूनही या आजाराचा काही प्रमाणात त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी खास ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू केलं आहे. कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी ४० टक्के जणांना गेले काही महिने श्वास लागणे, छातीत दुखणे, हृदयाविषयीच्या समस्या, सांधेदुखी, मेंदू व मज्जारज्जूच्या समस्या असे त्रास होत आहेत.

नवी मुंबईतून अनेक सामाजिक, राजकीय संघटनेकडून पोस्ट कोविड सेंटर उभारावे अशी मागणी सातत्याने आयुक्तांकडे केली जात आहे. पालिका देखील त्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र अपोलोने पोस्ट कोविड सेंटर स्थापून नवी मुंबईकरांना आधार दिला असून यातून कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार घेता येतील.  

अपोलो हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी व युनिट प्रमुख संतोष मराठे म्हणाले की, कोरोना मधून बऱ्या झालेल्या, मात्र आता इतर आजारांची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांकडे वेळीच विशेष लक्ष न दिल्यास त्यांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर होतील. कोरोना मधून बरे झालेले व आता अनेक तक्रारी करणारे २५० रुग्ण आमच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडी) आहेत. येथे या रुग्णांमधील कोरोना पश्चात तीव्र लक्षणे वाढू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. ‘

कोव्हॅलेसंट प्लाझमा’च्या चाचण्या व त्याचे दान हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका ‘एनएमएमसी’ च्या सहकार्याने राबविण्याबरोबरच ‘अपोलो हॉस्पिटल’मध्ये रुग्ण-केंद्रित, सर्वसमावेशक, टेलिमेडिसिन क्लिनिक पद्धतींनी सुद्धा कोरोनावर उपचार करण्यात येतात.


हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावरRead this story in हिंदी
संबंधित विषय