आणखी चार स्थानकांवर 1 रुपयांत उपचार सुरू

Mumbai
आणखी चार स्थानकांवर 1 रुपयांत उपचार सुरू
आणखी चार स्थानकांवर 1 रुपयांत उपचार सुरू
आणखी चार स्थानकांवर 1 रुपयांत उपचार सुरू
See all
मुंबई  -  

घाटकोपरनंतर मुंबईतील दादर, मुलूंड, कुर्ला आणि वडाळा रोड या चार स्थानकांजवळ एक रुपयांत वैद्यकीय सेवा देणारे चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. घाटकोपर पूर्वेला एक रुपयात वैद्कीय सेवा देणारे पहिले चिकित्सालय 10 मे पासून सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवारपासून दादर, मुलूंड, कुर्ला आणि वडाळा रोड या स्थानकांजवळ हे वैद्यकीय चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. घाटकोपरच्या चिकित्सालयात आतापर्यंत जवळपास 800 रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

रेल्वे प्रवाशांना होणारे अपघात, तात्काळ वैद्यकीय सेवा न मिळण्याने होणारे मृत्यू या प्रमाणात चिंताजनकरित्या वाढ होत अाहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावे या उद्देशाने रेल्वेच्या निवडक स्थानकांवर ही वैद्यकीय चिकित्सालयाची सुविधा दिली जात आहे. सर्वसामान्यांना अगदी परवडणारी अशी ही वैद्यकीय सुविधा आहे.

शनिवारपासून दादर पूर्वेकडील हनुमान मंदिराच्या शेजारी, मुलूंड पश्चिम आणि कुर्ला पूर्व येथे एका रुपयांत वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. वडाळा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हे चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे.

याविषयी चिकित्सालय उपक्रमाचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत 800 रुग्णांची तपासणी केल्याचे सांगितले. येथे बहुतेक रुग्ण मधुमेह, ब्लडप्रेशर चेक करण्यासाठीच येत असून कामाच्या गडबडीत आपण अनेकदा रुटीन चेकअप करणेही विसरतो. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीकोनातून ही एक उत्तम सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या चिकित्सालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे ब्लडप्रेशर, इसीजी अशा प्रकारची तपासणी अगदी काही मिनिटांतच होते. त्यामुळे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना येथे जास्त वेळ घालवायची गरज नाही. रुग्णांची तपासणी करण्यासाठी विशेष डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. चिकित्सालयात रक्त तपासणी करणाऱ्यांना दवाखान्यापेक्षा 20 टक्के सवलत आहे. औषधांवर 10 टक्के सूट आहे. चिकित्सालयाच्या बाजूला रेल्वेचेच औषध केंद्र आहे. जिथून औषध खरेदी करु शकता येतील. येथे जेनेरिक म्हणजे स्वस्त दरातील औषधेही उपलब्ध आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.