सहा महिन्यानंतरही रावतेंचं आश्वासन अपूर्णच

  Mantralaya
  सहा महिन्यानंतरही रावतेंचं आश्वासन अपूर्णच
  मुंबई  -  

  पाच ते सात महिन्यात राज्यातील एसटी स्थानकांत जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते पण पाच महिने उलटूनही एसटी मंडळात जेनेरिक औषधं मिळत नसल्याचं समोर आलंय. राज्यातील 500 पेक्षा जास्त एसटी स्थानकांमध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध करून दिली जातील, असे सांगण्यात आलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही एसटी स्थानकांमध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध झाली नसून जेनेरिक औषधांची निविदा प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

  याविषयी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निविदा काढायला अजून वेळ लागणार असल्याचे सांगितले. तसेच जेनेरिक औषधे एसटी स्थानकांमध्ये असणे, ही आपली इच्छा आहे. या कामासाठी काही जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर एसटी स्थानकात जेनेरिक औषधे सुरू करणार असल्याचे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिलंय.

  देशभरामध्ये जेनेरिक औषधांची विक्री सुरू आहे. मात्र राज्यात केवळ 200 ते 300 जेनेरिक औषधांची दुकाने उपलब्ध आहेत. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त दरात औषधे मिळत नाहीत. एसटीने प्रवास करणारे प्रवासी मध्यमवर्गीय आणि गरीब असतात. त्यांना स्वस्त दरात औषधं मिळावीत, यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.