Advertisement

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग निम्म्यावर

मुंबईकरांसाठी आता एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग निम्म्यावर आला आहे.

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग निम्म्यावर
SHARES

मुंबईकरांसाठी आता एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग निम्म्यावर आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईचा रुग्णसंख्या वाढीचा दर 6.61 टक्के वर होता. हा वाढीचा दर गुरूवारी 3.62 टक्क्यांवर आला आहे.

भायखळा, मुंबई सेंट्रलचा समावेश असणा-या ई वॉर्ड मधील रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात कमी म्हणजे 1.7 टक्के आहे. मात्र, दहिसरचा समावेश असणा-या आर उत्तर विभागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त ७.४ टक्के आहे.

जी उत्तर (माहिम, दादर, धारावी) मध्ये सर्वाधिक ३,२५८ रुग्ण आहेत. मात्र इथं तुलनेनं रुग्णसंख्या वाढ रोखण्यात यश येत आहे. येथील रुग्णसंख्या वाढीचा दर २.६ टक्के आहे. जी उत्तर नंतर कुर्ल्याच्या एल विभागात सर्वात जास्त २८४७ रुग्ण आहेत. 

मुंबईत गुरूवारी १ हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४ ४ हजार ७०४ वर पोहचली आहे. त्यापैकी १८०९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५३६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा -

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन २९३३ रुग्ण

अनुपस्थित कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका, कामावर हजर न राहिल्यास नोकरी जाणार
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय