दिव्यांगांना मदत

 Andheri
दिव्यांगांना मदत
दिव्यांगांना मदत
दिव्यांगांना मदत
दिव्यांगांना मदत
See all

अंधेरी - लायन्स क्लब ऑफ बॉम्बे ओशिवरा क्रेसेंटकडून अंधेरी परिसरातील 50 दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यात आली. लायन्सचे डॉ. आर.जी.राव यांच्या नेतृत्वाखाली ही मदत करण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींना व्यक्तीना प्रत्येकी 20 किलो प्रमाणे (डाळ,गहू व तांदूळ ) सोलापुरी चादर, मॅट चटई, 2 व्हीलचेअर,1 ट्रायसिकल व इतर जीवनावश्यक वस्तू मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच "2 ऑक्टोबर ते 9 पर्यंत वेगवेगळ्या विभागात आरोग्य शिबीर,ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन, विदयार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तू, असे अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत", असे डॉ.आर.जी.राव यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी लायन्सचे डॉ.अजित जैन, रामास्वामी, एल.रामा स्वामी, राजेंद्र गोयल, हरीश खंडेलवर, शैलेश पटेल, विनोद शहा आणि रेम नटराजन उपस्थित होते.

Loading Comments