आरोग्य केंद्राची दुरवस्था

 Mazagaon
आरोग्य केंद्राची दुरवस्था

भायखळा - बी विभागातील जंजिकर स्ट्रीटवरील आरोग्य केंद्राची दुरवस्था झालीय. तसंच आरोग्य केंद्रात डॉक्टरचं उपलब्ध होत नसल्याचं समोर आलंय. सोयीसुविधेच्या अभावी रुग्णांना वेळेवर औषधही उपलब्ध होत नाहीत. नियमावलीनुसार 24 तास डॉक्टर रुग्णांसाठी इथं उपलब्ध असणं गरजेचं आहे. पण सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान डॉक्टर उपलब्ध असतात. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही आणि वॉर्ड ऑफिसर पूर्वा पावस्कर यांना विचारलं असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. तर डॉक्टर अनेकदा उपलब्ध होत नसल्याचं रुग्ण बिलाल इकबाल सय्यद यांनी सांगितलं.

Loading Comments