Advertisement

आरोग्य विभागाची 'हि' सुविधा बंद

वाहतूककोंडी आणि अन्य कारणांमुळे 'ही' योजना बंद करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाची 'हि' सुविधा बंद
SHARES

आरोग्य विभागानं गरजू रुग्णांना वेळेवर आणि सरकारी शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा उपलब्ध केली होती. 'ब्लड ऑन कॉल' असं या सुविधेचं नाव होतं. परंतु, आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. या सेवेमार्फत रक्ताची उपलब्धता तपासण्यासाठी १०४ या क्रमाकांवर फोन करणे अपेक्षित होते. दुचाकीस्वाराच्या माध्यमातून गरज असलेल्या ठिकाणी रक्त उपलब्ध करून देण्यात येणार होते. परंतू वाहतूककोंडी आणि अन्य कारणांमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये प्रत्येक रुग्णालय तसेच छोटी नर्सिग होम्स ही रक्तपेढ्यांसोबत संलग्न आहेत. मात्र ही योजना सुरू करताना रुग्णालयाशी संलग्न विविध उपनगरांमध्येही रक्त संकलन केंद्रांची सुविधा सुरू करण्यात येणार होती. यातील एक केंद्र हे बोरिवली येथील भगवती रुग्णालयात सुरू होणार होतं. मात्र, या रुग्णालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू झाल्यानं कांदिवलीत हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महापालिकेनं शताब्दी रुग्णालयात रक्तपेढी सुरु केल्यामुळं या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्याचा उपक्रम पूर्णत्त्वास गेला नाही.

'ब्लड ऑन कॉल' ही सुविधा ज्या दरामध्ये देते त्यात व खासगी रक्तपेढ्यांमार्फत दिलेल्या रक्ताच्या दरात तफावत आहे. त्यामुळं ही योजना बंद करण्यासाठी खासगी रक्तपेढ्यांनी दबाव आणण्यासाठी वेळोवेळी आक्रमक पवित्राही घेतला.

रक्तांचं संकलन मोफत करायचं मात्र, रुग्णाला परतावा देताना अधिक किंमतीची आकारणी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात. या कारणांमुळंही 'ब्लड ऑन कॉल' ही योजना बंद करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 



हेही वाचा -

एमएमआरडीएची अग्निशमन सेवा, या परिसरात पुरवणार सुविधा

दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुख



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा