Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आरोग्य यंत्रणा व प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातत्याने सर्व स्थितीचा आढावा घेत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण
SHARES

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी त्यांचा कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आला. आता यापाठोपाठ राजेश टोपे यांचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आरोग्य यंत्रणा व प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातत्याने सर्व स्थितीचा आढावा घेत आहेत.  बैठकांचेही सत्र गेले काही दिवस वाढले होते. या व्यस्ततेतच टोपे यांना कोरोनाची लागण झाली.  गुरुवारी सकाळीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. त्यापाठोपाठ दुपारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्री टोपे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे एकाच दिवशी राष्ट्रवादीचे तीन प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.हेही वाचा -

कोरोनामुळं महापालिकेतील 'इतक्या' अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात होणार बदलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा