• तुमच्या चिमुकल्यालाही ह्रदयरोग होऊ शकतो!
SHARE

भारतातल्या जवळपास सर्वच मेट्रोपोलिटन शहरांमध्ये जीवनमान प्रचंड तणावपूर्ण झालं आहे. मुंबईही त्याला अपवाद नाही. याच तणावपूर्ण राहणीमानामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत ह्रदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र आत्तापर्यंत प्रौढांमध्ये आढळणाररा ह्रदयरोग हळूहळू लहान मुलांमध्येही आढळू लागला असून त्याचं प्रमाण धक्कादायक रित्या वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे पुरेशा साधन-सुविधांअभावी या लगान मुलांवर वेळेवर उपचार करणं शक्य होत नाही. राज्य आरोग्य संचालयाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

शाळेत जाणाऱ्या मुलांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह मुंबईतील अनेक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करुन ह्रद्य आणि पोटाचे विकार, डोळे तसंच अन्य आजारांनी ग्रासलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यानुसार 2016-17 मध्ये शालेय आरोग्य तपासणी सर्वेक्षणात 2,530 मुलांना गंभीर स्वरूपाचा हृदयविकार असल्याचे उघड झाले आहे. आणखी धक्कादायक म्हणजे ही सर्व मुलं 0 ते 15 वयोगटातील आहेत.

2016 - 2017

राज्य आरोग्य संचालयाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, 2016 -17 या वर्षात मुंबईसह राज्यात 2,530 लहान मुलांना ह्रद्यविकाराच्या आजारानं ग्रासलं आहे. त्यातील 1,430 मुलांवर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, 624 मुलांवर या ना त्या कारणावरुन उपचार झालेले नाहीत. तर, 165 मुलांवर शस्त्रक्रिया होणार असून अद्याप या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.
2014 - 2015

2014-15 या वर्षी 3,493 लहान मुलांना हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. त्यातील 2,226 मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यातील 39 मुलांच्या शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेतून करण्यात आल्या आहेत. तर 1,177 मुलांवर काही कारणास्तव उपचार झालेले नाहीत. यात निदान झाल्यानंतर उपचारासाठी न येणे, स्थलांतर तसेच शस्त्रक्रियेची गरज नसणे अशी अनेक कारणं आहेत.


2015 -2016

2015-16 मध्ये 3,899 मुलं हृदयरोगी असल्याचे निदान झाले असून यातील 2,523 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील 112 जणांना आरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. तर, 1,172 जणांवर उपचार करण्यात आलेले नाहीत. तर 92 शस्त्रक्रिया रखडल्या होत्या.

ही सर्व आकडेवारी लक्षात घेता लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे आहे. कारण, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या रुग्णांची ही आकडेवारी असून प्रत्यक्षात मात्र हा आकडा अधिक असल्याचं बोलंल आहे.


बालहृदय रोगाची कारणे  

पस्तिशी उलटल्यानंतरच हृदयविकार होतो हा मुळातच गैरसमज आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही हृदयरोग होऊ शकतो. हा अनुवांशिक आजार असतो. मुळात नवजात बाळाच्या हृदयात छिद्र असतात हाही गैरसमजच आहे. कारण, बाळाचे हृदयाचे ठोके योग्य पद्धतीने पडायला 3 ते 4 आठवडे लागतात. विशेषतः नवजात बाळाला होणाऱ्या हृदयविकाराचे चार प्रकार आहेत.

पडद्याला छेद - हृदयाच्या आतील भागात वर-खाली दोन्ही बाजूला पडदा असतो. खालच्या पडद्याला छेद असेल, तर अशुद्ध रक्त शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये मिसळते.

ब्लू बेबी - अशुद्ध रक्त फुफ्फुसाद्वारे शरीरात पसरते. या बाळाला ‘ब्लू बेबी’ म्हणतात. ह्रदयापर्यंत जाणारी रक्तवाहिनीची नस या प्रकरणात दबलेली असते. त्यामुळे बाळाला प्राणवायू मिळत नाही. अशावेळी लहान मूल काळवटते किंवा निळसर पडते. अशावेळी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.

सिनॉसिस - हृदयाला चार मोठ्या झडपा असतात. त्यामुळे या तिसऱ्या प्रकरणात बाळाचा हृदयाचा झडपा नीट तयार होत नाहीत. याला ‘सिनॉसिस’ असं म्हणतात. यात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. अशावेळी बलूनचा वापर करावा लागतो.

कार्डिओमायोपॅथी या चौथ्या प्रकारात हृदय आकुंचन पावते. हा प्रकार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.


हृदयविकाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढत आहेत. शीव रुग्णालयातील बाहृयरुग्ण विभागात महिन्याला जवळपास 100 लहान मुलं हृदयविकाच्या उपचारांसाठी येतात. पण, सर्वांनाच शस्त्रक्रियेची गरज पडते असं नाही. काही मुलांना औषधांनीही बरं करता येतं. याशिवाय प्रत्यारोपण करण्याची गरज साधारणतः 1 ते 2 टक्के प्रकरणांतच भासते. पण महत्त्वाची बाब म्हणजे अनेकदा निदान उशीरा होते, त्यामुळे आजार बळावतो. त्यामुळे हृदयविकाराचे वेळेवर निदान होणेही गरजेचे आहे.

डॉ. मिलिंद फडके, हृदयविकार तज्ज्ञ आणि सहयोगी प्राध्यापक, शीव रुग्णालय


तज्ज्ञांचा सल्ला

हृदयविकार हा जन्मतःच होऊ शकतो. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, अनेकदा निदान व्हायला उशीर होतो. त्यामुळे आजार बळावतो. यामुळे हृदयविकाराच्या शंकेचे निरसन करण्यासाठी जन्म झाल्यापासून बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना टूडीइको कार्डिओग्राफी तपासणी डॉक्टरांकडून करून घेणे आवश्यक आहे. या तपासणीचा अहवाल बालरोग हृदयविकार तज्ज्ञांकडून बालरोग हृदयशल्यविशारद(सर्जन) कडून तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यात अहवालात दोष आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करावेत.


केईएम रुग्णालयात महिन्याला 200 च्या आसपास रुग्ण बाहेरुन येतात. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातून 120 बालरुग्ण बाहृयरुग्ण विभागात उपचारांसाठी येतात. उपचार करण्यासाठी लहान मुलांमधल्या ह्र्दयविकाराच्या आजाराचं निदान लवकर होणं गरजेचं असतं.

डॉ. अंकुर फादरपेकर, ह्रदयरोगतज्ज्ञ, केईएम रुग्णालय


बालहृदयरोगाची लक्षणे

  • चार ते पाच दिवसांहून अधिक ताप राहणे
  • हातापायाची बोटं आणि त्वचा लाल होणे
  • त्वचेवर येणारे पुरळ
  • डोळे लाल होणे
  • जीभ आणि ओठ लाल होणेहेही वाचा

निरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या