Advertisement

१४५० हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित

सिडकोकडून पनवेल तालुक्यातील आपल्या ताब्यातील २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१४५० हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित
SHARES

जागतिक खारफुटी दिनानिमित्त अनेक सरकारी यंत्रणांनी १४५० हेक्टरपेक्षा जास्त खारफुटीची क्षेत्र राखीव जंगले म्हणून ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही खारफुटीची क्षेत्र मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आहेत.

सिडकोकडून पनवेल तालुक्यातील आपल्या ताब्यातील २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संबंधित प्राधिकरणांकडून आपापल्या अखत्यारीतील कांदळवन क्षेत्रांचे वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. 

सिडकोकडील पनवेल तालुक्यातील कामोठे आणि पनवेल येथील एकूण २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्रही वन विभागाला हस्तांतरित होणार आहे. या संदर्भात सिडकोने रायगड जिल्हाधिकारी, यांच्याशी पत्रव्यवहार केला असून त्यांच्याकडून २७ जुलै रोजी सिडकोच्या कांदळवन क्षेत्राचा ताबा घेण्यात आला असून त्यानंतर हे क्षेत्र वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात पनवेल आणि उरण तालुक्यांतील काही कांदळवन क्षेत्रे, कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा