Advertisement

ब्रिजकोर्ससाठी उपोषणानंतर आता होमिओपॅथ डॉक्टरांची पदयात्रा

तीन दिवसांनंतरही आंदोलनाची सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे, बुधवारी सकाळी होमिओपॅथी डॉक्टरांनी जे.जे. रुग्णालय ते आझाद मैदान अशी रॅली काढली. या आंदोलनात जवळपास ५००० डॉक्टर सहभागी झाले आहेत.

ब्रिजकोर्ससाठी उपोषणानंतर आता होमिओपॅथ डॉक्टरांची पदयात्रा
SHARES

'होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीसाठी ब्रिजकोर्स द्या' या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून होमिओपॅथी डॉक्टरांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं आहे. मात्र, तीन दिवसांनंतरही आंदोलनाची सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे, बुधवारी सकाळी होमिओपॅथी डॉक्टरांनी जे.जे. रुग्णालय ते आझाद मैदान अशी रॅली काढली. या आंदोलनात जवळपास ५००० डॉक्टर सहभागी झाले आहेत.



आमच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. अजूनही राज्य किंवा केंद्र सरकारने एनएमसी विधेयकात ब्रिजकोर्स हवा, याबाबत निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आम्ही पदयात्रा काढून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. प्रकाश राणे, सदस्य, होमिओपॅथी डॉक्टर्स फेडरेशन


राज्यात लागू, केंद्रात कधी?

याविषयी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.‌ प्रवीण शिंगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यात अशा प्रकारच्या ब्रिज कोर्सची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं. मात्र, त्याचवेळी आंदोलकांच्या मागणीनुसार देशभर हा कोर्स लागू करण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं.



का हवाय ब्रिजकोर्स?

गामीण भागात काम करण्यासाठी डॉक्टर सहसा तयार होत नाहीत. अशावेळी आयुर्वेदिक डॉक्टर गावखेड्यात सेवा पुरवत आहेत. या डॉक्टरांना पारंपरिक औषधांसह मॉडर्न मेडिसीन रुग्णांना देता यावी, याकरता त्यांना अँटिबायोटिक आणि मल्टीड्रग्जची माहिती करुन देण्यासाठी अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देत ब्रिजकोर्स सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर केंद्र सरकारनंही संपूर्ण देशात हा ब्रिजकोर्स सुरू करण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकात याचा अंतर्भाव केला. पण, यासंदर्भात आयएमएच्या डॉक्टरांनी 'आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी नको' अशी मागणी केली आहे.



हेही वाचा

वैद्यकीय शिक्षणासाठी आता ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक’!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा