बोरिवलीतल्या रुग्णालयात तरुणीची आत्महत्या

बोरिवली - रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी घेत एका तरुणीने आत्महत्या केली आहे. बोरिवली (पू.) कॉर्टर रोड नं. दोन इथल्या क्रांती ज्योती सावित्री फुले या पालिका रुग्णालयात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची तक्रार नोंदवली. पण तिच्या कुटुंबियांनी आता रुग्णालयावर निष्काळजीचा आरोप केला आहे.

पार्वती धुना (18) असं त्या तरुणीचं नाव असून ती बोरिवली (पू.) दौलतनगर इथे आपल्या पालकांसोबत राहते. ताप आणि पोटात दुखत असल्यानं तिला 11 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्या आईने सांगितलं की, 12 जानेवारीला पार्वतीच्या पोटात असह्य वेदना होत असल्यानं नारळपाणी आणण्यासाठी गेली होती. तोच पार्वतीने रुग्णालयातील टेरेसचा दरवाजा तोडत गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. त्यावेळी झालेल्या आवाजाने रुग्णालयातील कर्मचारानी धाव घेत तात्काळ तिला रुग्णालयात आणले. मात्र त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता. याची माहिती मिळताच कस्तुरबा पोलिसांनी रुग्णालयाचा पंचनामा करून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र इतक्या लहान मुलीने हा दरवाजा तोडलाच कसा आणि सुरक्षारक्षक तेव्हा कुठे गेले होते असं म्हणत रुग्णालयावर निष्काळजीचा आरोप केला. पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येची तक्रार दाखल करत पुढील तपास करत आहेत.

Loading Comments