Advertisement

कोरोना रुग्णाला रुग्णालयात कसं दाखल कराल?

कोरोना रुग्णाला रुग्णालयात कसं दाखल करायचं? हे जाणून घ्या.

कोरोना रुग्णाला रुग्णालयात कसं दाखल कराल?
SHARES

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता वैद्यकिय सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णाला रुग्णालयात कसं दाखल करायचं हा मोठाच प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. आज आम्ही तुम्हाला या परिस्थितीत काय करता येईल यासंदर्भातच माहिती देणार आहोत.


रुग्णालयात दाखल कधी करावे?

  • श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा दम लागत असेल
  • शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ वरून घसरुन ९० वर आली असेल
  • तुमचे वय ६० वर्षांहून अधिक असेल आणि तुम्हाला इतर काही आजार असेल
  • रुग्णालयात दाखल होत असाल तर ऑक्सिजन (Oxygen) किंवा व्हेंटिलेटरची गरज आहेच असं नाही.
  • वरील सर्व परिस्थितीत तुमच्यावर आयसीयू आणि व्हेंटिलेटरविना उपचार होऊ शकतात.
  • वरील सर्व लक्षणं असतील तर डॉक्टर रुग्णालयात दाखल करायचा सल्ला देतील.


रुग्णालयात दाखल करण्यासाठी संपर्क

मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ही दूरध्वनी क्रमांकाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतल्या २४ वॉर्डनुसार दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.

या क्रमांकांच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती किंवा रुग्णाला आपल्या वॉर्डमधल्या कंट्रोल रुमला फोन करून कुठल्या रुग्णालयात बेडशी संबंधित किंवा कोविड-१९ शी संबंधित सर्व माहिती मिळवता येणार आहे.

कुठल्या रुग्णालयात दाखल करायचं ठरल्यास रुग्णालयाची अॅम्ब्युलंस येईल आणि रुग्णाला घेऊन जाईल.


बेड उपलब्ध नसल्यास काय करावं?

  • जर एखाद्या रुग्णाची प्रकती खूपच खालावली असेल तर तात्काळ रुग्णालयात दाखल करावं.
  • हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधण्यापेक्षा रुग्णाच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं जवळच्या रुग्णालयात बेड रिकामा आहे का? हे स्वत: जाऊन पाहावं.
  • जाताना रुग्णाचे सर्व रिपोर्ट्स घेऊन जावेत.
  • बेड उपलब्ध असेल तर रुग्णाला अम्ब्युलसनं रुग्णालयात दाखल करावं.
  • जर कुठल्याच रुग्णालयात बेड उपलब्ध झाला नाही तर रुग्णासाठी घरच्या घरी ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen cylinder)ची सोय करावी. जेणेकरून बेड मिळेपर्यंत रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा होत राहिल.



हेही वाचा

रेमडेसिवीर हवंय? 'या' क्रमांकावर करा काॅल

मासिक पाळी दरम्यान लस घ्यावी का? लसीबद्दलचे 'हे' गैरसमज दूर करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा