Advertisement

महानगरपालिका रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) रुग्णालयांसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे पालिका रुग्णालये (Municipal hospitals) आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी परिपूर्ण होणार आहेत.

महानगरपालिका रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
SHARES

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) रुग्णालयांसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे पालिका रुग्णालये (Municipal hospitals) आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी परिपूर्ण होणार आहेत. १६ उपनगरीय रुग्णालयांसाठी कॉम्प्यूटराइज्ड रेडिओग्राफी प्रणाली, दहा कलर डॉप्लर्स यूसीजी मशिन्स खरेदी केल्या जाणार आहेत.

सायन (Sion), केईएम (KEM), नायर (Nair) या रुग्णालयांमधील कान (Ear), नाक (nose), घसा (throat), नेत्रचिकित्सा, प्लास्टीक सर्जरी आणि मूत्रशल्यरोग चिकित्सा या विभागांकरिता लेझर मशीन (Laser machine) कार्यान्वित करण्यात येणार आहे. विलेपार्ले येथील शिरोडकर प्रसूतिगृह, देवनार शिवाजीनगर येथील प्रसूतिगृह याचेही बांधकाम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल. बोरीवली पंजाबी गल्ली येथे टोपीवाला प्रसूतिगृह व चिकित्सा केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते लवकरच कार्यान्वित होईल. हे प्रसूतिगृह खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर चालविण्यात येईल. या वर्षांत कांदिवली शताब्दी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.

सायन (Sion), केईएम (KEM), नायर (Nair) रुग्णालयात तीन एमआरआय मशिन्स (MRI Machines) व तीन सिटीस्कॅन मशिन्ससाठी ४० कोटींची तरतूद केली आहे.  केईएम रुग्णालयात न्यूरो शस्त्रक्रिया केंद्र दर्जेदार करण्यात येणार आहे. सायन रुग्णालयात फक्त न्यूरोलॉजीच्या रुग्णांवर उपचारांसाठी दोन कोटी इतक्या खर्चाने नवीन डी.ए.ए.मशीन खरेदी करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातही अशी मशीन कार्यान्वित करण्यात येईल. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५०२ कोटी, राजावाडी रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृहासाठी १५.२२ कोटी, बोरीवलीच्या आर.एन.भगवती रुग्णालयासाठी ५९२ कोटी, मुलुंड एम.टी.अग्रवाल रुग्णालयासाठी ४५७ कोटी, वांद्रे भाभा रुग्णालयासाठी २८७ कोटी ही कामे प्रगतिपथावर आहेत.हेही वाचा -

कस्तुरबा रुग्णालयाला मिळणार बळकटी, २ कोटींची तरतूद

कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा