Advertisement

कोरोनाची चौथी लाट २२ जूनपासून, IIT कानपूरचा अंदाज

आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा अंदाज वर्तवला जात आहे.

कोरोनाची चौथी लाट २२ जूनपासून, IIT कानपूरचा अंदाज
SHARES

भारतात कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) जूनपासून सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा अंदाज वर्तवला जात आहे.    

ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असेल. ही लाट जवळपास चार महिने राहू शकते, असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. आयआटी कानपूरमधील संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेलवर हा अंदाज जारी करण्यात आला आहे.

आयआयटी कानापूरमधील गणित आणि सांख्यिकी विभागाचे साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्र शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाची चौथी लाट नव्या वेरिएंट आणि देशातील कोरोना लसीकरणाची स्थिती यावर अवलंबून असेल.

संशोधकांच्या अंदाजानुसार, भारतात कोरोना संसर्गाची चौथी लाट प्राथमिक आकडेवारीनुसार २२ जून २०२२ रोजी कोरोनाची चौथी लाट सुरू होऊ शकते आणि २३ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लाट वाढेल. त्यानंतर कोरोना संसर्गाची लाट ओसरण्यास सुरुवात होईल.

२४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत कोरोना संसर्गाची लाट ओसरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि त्याची संक्रामकता यावर अवलंबून असेल.

जागतिक आरोग्य संघटेनं मे- जून च्या दरम्यान कोरोना विषाणूच्या पॅटर्नचं निरीक्षण करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कोरोनाची लाट आली नाहीतर एंडेमिकची घोषणा करण्यात येईल. चौथ्या लाटेचं स्वरुप मलेरिया आणि चिकनगुनियासारखं असू शकतं.

जागतिक आरोग्य संघटेननं गर्दीच्या ठिकाणी रेल्वे आणि बसेसमध्ये मास्क लावणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.



हेही वाचा

'या' कोरोना रुग्णालयांतील सामग्री एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू

२ वर्षांनंतर महाराष्ट्रात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा