अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

Mumbai
अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे
अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे
अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे
See all
मुंबई  -  

मुंबई - आयएमए पाठोपाठ मार्डच्या डॉक्टरांनीही संप मागे घेतला आहे. संप मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने हायकोर्टात सादर केले. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत डॉक्टर कामावर रुजू होतील, असे आश्वासन मार्डच्या वतीने देण्यात आले.

डॉक्टरांवर कारवाई करण्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने हाटकोर्टात दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करावे, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. प्रतित्रापत्र सादर न केल्यास मार्डच्या अध्यक्ष आणि सचिवांवर कारवाई करू असा इशाराही हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर मार्डने सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व डॉक्टर कामावर रुजू होतील असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत डॉक्टरांच्या आडमुठी भूमिकेवर संताप व्यक्त केला. विधानसभेत निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मार्डसोबत बैठक झाली. या बैठकीत आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, वैद्यकीय आरोग्य मंत्री गिरीष महाजन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटीलही उपस्थित होते. 

बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मार्डच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. डॉक्टरांना सुरक्षा देण्यात येईल. तसेच अशी घटना पुढे घडलीच तर त्याचा सर्व खर्च सरकार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर संप मागे घेतला.

- डॉ. शिवकुमार उत्तुरे, खजिनदार, आयएमए

दरम्यान मार्ड डॉक्टरांच्या संपामुळे गेल्या तीन दिवसात 135 रुग्णांनी प्राण गमावले.

हॉस्पीटल
रुग्णांची संख्या
केईएम
53
नायर
34
सायन
48


आणखी वाचा - मुख्यमंत्री म्हणतात, 'इनफ इज इनफ'

https://www.mumbailive.com/mr/city/enough-is-enough-says-cm-issues-final-warning-to-striking-docs-9494

हायकोर्टाचे डॉक्टर्सना खडे बोल

https://www.mumbailive.com/mr/city/mumbai-high-court-takes-mard-and-striking-doctors-to-task-9496


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.