Advertisement

पंतप्रधानांनी 'कशी' केली डाॅक्टरांची बदनामी?

भारतातील डॉक्टर जगभरात त्यांच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध आहेत. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये भारतीय डॉक्टरांविरुद्ध असं वक्तव्य का केलं? या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून आयएमएच्या डॉक्टरांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. शिवाय, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी याबाबतचा व्हिडिओ तयार करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी 'कशी' केली डाॅक्टरांची बदनामी?
SHARES

लंडनच्या दौऱ्यावर असताना ''भारतातील डॉक्टर आणि औषध कंपन्यांध्ये साटंलोटं'' असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केलं होतं. या वक्तव्यामुळे भारतातील डाॅक्टरांची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सोमवारी निषेध केला. या निषेधाचं पत्रचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर आणि मानद सचिव डॉ. आर.एन.टंडन यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे.


भारतीय डाॅक्टर जगात नावाजलेले

भारतातील डॉक्टर जगभरात त्यांच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध आहेत. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये भारतीय डॉक्टरांविरुद्ध असं वक्तव्य का केलं? या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून आयएमएच्या डॉक्टरांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. शिवाय, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी याबाबतचा व्हिडिओ तयार करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.


काय आहे व्हिडिओत

या व्हिडिओत डॉ. वानखेडकर यांनी आयएमए पाठपुरावा करत असलेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. 'समान औषध समान किंमत' ही मागणी आयएमए गेल्या काही वर्षांपासून करत आहे. औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवणं हे सरकारच्या हातात आहे. सरकार याबाबत काहीच का करत नाही? सरकारकडून आरोग्य सेवेवर पैसा का खर्च केला जात नाहीत, जेणेकरून सरकारी वैद्यकीय सेवा परवडणारी होईल. सरकार आरोग्य बजेटमध्ये वाढ का करत नाही? असे अनेक प्रश्न या व्हिडीओतून डॉ. वानखेडकर यांनी पंतप्रधानांना आणि सरकारला विचारले आहेत.तर, आरोग्यसेवा कोलमडेल

सरकारने आरोग्याचा बजेट वाढवला असता तर, रुग्णालयांची संख्या आणि रुग्णांना चांगले उपचार मिळाले असते. शिवाय, अशा प्रकारे वक्तव्य करून वैद्यकीय व्यवसायाची बदनामी पंतप्रधानांकडून केली जात आहे. देशातील वैद्यकीय व्यवस्था भारतीय डॉक्टर नसतील तर कोलमडून जाईल, असं ही डॉ. वानखेडकर यांनी त्यांच्या व्हिडिओत स्पष्ट केलं आहे.


पत्रातील काही प्रमुख मुद्दे

  • इंडियन मेडिकल असोसिएशनने नेहमीच जेनेरिक औषधांसाठी पुढाकार घेतला.
  • सरकारतर्फे केवळ १ टक्का औषधांची चाचणी केली जाते.
  • इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुख्यालयात जेनेरिक औषधांचं दुकान आहे.
  • भारत सरकार औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा का देतं?
  • एकच औषध नाव बदलून वेगवेगळ्या विभागात औषधं कंपन्या कशा काय विकू शकतात?
  • देशभरातील डॉक्टर औषधं आणि स्टेंटच्या किमतींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.हेही वाचा-

डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे

अशा डॉक्टरांना घरीच बसवा!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा