Advertisement

Covid Updates: कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक, TIFR चा दावा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी तिसरी लाट तीव्र नसेल, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) केला आहे.

Covid Updates: कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक, TIFR चा दावा
SHARES

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. अशातच आता नागरिकांमध्ये तिसऱ्या लाटेची भिती निर्माण झाली आहे.  मात्र, या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असेल असा दावा टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) संशोधकांनी केला आहे. 

जवळपास ८० टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका मुंबईकरांना तुलनेने कमी असेल, असं टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संशोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान, ह्या अभ्यासात दुसऱ्यांदा कोरोना होणाऱ्यांचा विचार केलेला नाही. तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा कोरोना होणं हा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पहिल्या लाटेत कोरोना झालेल्यांमधील प्रतिपिंडे आता कमी झाली असतील. त्यामुळे त्यांना या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे अभ्यासक आणि डीन डॉ. संदिप जुनेजा यांनी सांगितलं. अजूनही ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, अशा २० टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. 

८० टक्के नागरिकांपैकी १० टक्क्यांना पुन्हा लागण होईल असं गृहीत धरुया. त्यांना लागण झाल्यावर तशाच प्रकारची लक्षणं दिसतील आणि त्याच क्रमाने ते बरे होतील, असंही संशोधकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी तिसरी लाट तीव्र नसेल, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) केला आहे. आयसीएमआरचं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरील संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (IJMR) प्रकाशित झालं आहे. यानुसार देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे, मात्र ती तीव्र नसेल असं म्हटलं आहे. लसीकरणामुळे कोरोना संक्रमणाची तीव्रती ६० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच देशात तिसऱ्या लाटेचा धोका कमी असू शकतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे. 



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा