Advertisement

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत 10 व्या स्थानी

देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 38 हजार 845 झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत 10 व्या स्थानावर पोहोचला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत 10 व्या स्थानी
SHARES
Advertisement

देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 38 हजार 845 झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांचे क्रमांक येतात.

भारतात मागील 24 तासात 6 हजार 977 कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. देशात आतापर्यंत 4 हजार 21 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 721 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे. तर मागील 24 तासांत 3 हजार 280 कोरोनामुक्त झाले. भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 77 हजार 103 आहे.

देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 231 झाला आहे. त्यातील 14 हजार 600 बरे झाले. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.06 टक्के आहे. तर मृतांचा आकडा 1635 आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले रुग्ण 33 हजार 988 आहे. मुंबईत 30 हजार 542 कोरोनाबाधित आहेत.

केरळमध्ये 847 रुग्ण असून त्यातील 521 बरे झाले आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 61.51 टक्के आहे. गेल्या दहा-बारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 61 टक्क्यांवर आला आहे.हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना
संबंधित विषय
Advertisement