Advertisement

भारतात जानेवारीपर्यंत मिळू शकते व्हॅक्सीनला आपत्कालीन मंजुरी

डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीस कोरोना व्हॅक्सीनला इमरजेंसी अप्रूव्हल मिळू शकते.

भारतात जानेवारीपर्यंत मिळू शकते व्हॅक्सीनला आपत्कालीन मंजुरी
SHARES

डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीस कोरोना व्हॅक्सीनला इमरजेंसी अप्रूव्हल मिळू शकते. दिल्ली -AIIMS चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरुवारी याची माहिती दिली.

डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत की, भारतात सध्या सहा लसींवर काम सुरू आहे. यात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि भारत बायोटेक लस फेज-3 ट्रायल्समध्ये आहेत. आम्हाला आशा आहे की डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या सुरूवातीस, त्यापैकी एखाद्याला ड्रग रेगुलेटरकडून आपत्कालीन मंजुरी मिळेल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, "लसिकरण करण्याची दोन उद्दिष्ट्य आहेत. ज्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे, त्या लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहेच. दुसरं म्हणजे, आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचाय. जेणेकरून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल. त्यासाठी जर देशातील ५०-६० टक्के लोकांना वॅक्सिन दिलं तर व्हायरसचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. व्हायरसचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग होणार नाही. अशाप्रकारे कोरोनाची रुग्णसंख्याही आटोक्यात येईल. १०० टक्के लोकांना लस देण्याची गरज भासणार नाही."

डॉ. गुलेरिया यांनी हे देखील सांगितलं की, आतापर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे असे म्हणता येईल की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. या लसीच्या सेफ्टी आणि अ‍ॅफिकेसीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ७० ते ८० हजार स्वयंसेवकांना लसी देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.

क्लिनिकल चाचण्या पूर्ण होण्यापूर्वी चीननं त्याच्या ४ आणि रशियाने २ लशींना मान्यता दिली होती. त्यानंतर यूकेनं अमेरिकन कंपनी फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोएनटेक यांनी २ डिसेंबरला तयार केलेल्या mRNA लसला तातडीची मंजुरी दिली. आता भारतात लस कधी येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


हेही वाचा

केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी 'यांची' होणार कोरोना चाचणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा