Advertisement

रामदेव बाबांवर १००० कोटींचा खटला दाखल

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडनं बुधवारी योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर १००० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

रामदेव बाबांवर १००० कोटींचा खटला दाखल
SHARES

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडनं बुधवारी योग गुरू बाबा रामदेव (ramdev baba) यांच्यावर १००० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

असोसिएशननं हा खटला रामदेव बाबा यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे दाखल केला आहे, ज्यामध्ये बाबा अ‍ॅलोपॅथीला कचरा आणि दिवाळखोर विज्ञान म्हणत आहेत.

त्याचबरोबर IMA च्या राष्ट्रीय युनिटनं या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटलं आहे की, पतंजलीचे मालक रामदेव यांच्या लसीकरणावर चुकीची माहिती देण्यावर बंद घातली पाहिजे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केला आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १० हजार डॉक्टर आणि लाखो लोक मरण पावले आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालवला पाहिजे.

बाबा रामदेव यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेतले होते. यावर असोसिएशनचं म्हणणं आहे की, रामदेव यांनी दिलेल्या निवेदनाला उत्तर म्हणून, जर त्यांनी येत्या १५ दिवसांत व्हिडिओ प्रसिद्ध केला नाही आणि लेखी माफी मागितली नाही तर त्यांच्याकडून १००० कोटी रुपयांची भरपाई मागितली जाईल.

यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) शनिवारी बाबा रामदेव यांच्यावर अ‍ॅलोपॅथी उपचाराविरूद्ध खोटा प्रचार केल्याचा आरोप केला होता. IMA नं रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठवली. रामदेव यांच्यावर खटला चालवण्याची मागणीही डॉक्टरांच्या समितीनं केली होती.

आयएमएनं लिहिलं आहे की, 'रामदेववीर यांनी असा दावा केला आहे की रेमेडसवीर, फॅविफ्लू आणि DGCI ने अप्रूव्ह दुसऱ्या ड्रग्समुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) आणि आरोग्यमंत्री यांच्या विश्वासार्हतेला आव्हान दिलं आहे. 

जून-जुलै २०२० मध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये रेमाडेसिविरच्या वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने मान्यता दिली. हे भ्रम पसरवण्यासाठी आणि कोट्यावधी लोकांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल बाबा रामदेव यांच्यावर खटला चालवला पाहिजे.

रामदेव यांनी फेवीपिराविरला तापेचे औषध असं म्हटलं होतं. यावरुन कळते की, मेडिकल सायन्सविषयी त्यांना किती कमी ज्ञान आहे.'



हेही वाचा

बाबा रामदेव आणि वाद! या ८ व्यक्तव्यांमुळे आले अडचणीत

सिंगापूरमध्ये कोविड -१९ ब्रीथहाइझर टेस्टला तात्पुरती मंजुरी, ६० सेकंदात निकाल देणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा