Advertisement

बाबा रामदेव आणि वाद! या ८ व्यक्तव्यांमुळे आले अडचणीत

यापूर्वी देखील त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत. चला त्याच्या विधानांवर नजर टाकू या, ज्यामुळे ते अडचणीत येतात.

बाबा रामदेव आणि वाद! या ८ व्यक्तव्यांमुळे आले अडचणीत
SHARES

योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येतात. यावेळी त्यांनी अ‍ॅलोपॅथीला कचरा आणि दिवाळखोर विज्ञान म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टिका होत आहे.

पण वादग्रस्त व्यक्तव्य करणं ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत. चला त्याच्या विधानांवर नजर टाकू या, ज्यामुळे ते अडचणीत येतात.

१) अ‍ॅलोपॅथीला कचरा आणि दिवाळखोर विज्ञान

रामदेव बाबा यांनी तीन दिवसांपूर्वी 'अ‍ॅलोपॅथी हे 'सिली सायन्स' आहे असं बोलून देशभर खळबळ उडवली. एवढेच नव्हे तर बाबा रामदेव यांनी असंही म्हटलं आहे की, अ‍ॅलोपॅथीची औषधे घेतल्यानंतर कोट्यावधी रुग्णांचा मृत्यू झाला. याआधीही जेव्हा बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषध कोरोनिल सुरू केलं तेव्हा देखील बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना लक्ष्य केले होते.

२) योगा मधुमेहावरील उपचार; इन्सुलिनची आवश्यकता नाही

आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योगाचे भारतीय वैद्यकीय यंत्रणेत काही फायदे आहेत आणि काही आजारांवर अ‍ॅलोपॅथी उपचारासाठी पूरक असल्याचं आढळून आलं आहे. मधुमेह देखील इन्स्युलिन न घेता बरा होऊ शकतो. हे जगातील पहिल्या १०० वैद्यकीय शोधांपैकी एक आहे, असा दावा करणं ही घोर चुकीची माहिती आहे. हे अत्यंत धोकादायक सल्ला देखील आहे जे वैद्यकीय व्यावसायिकांनी वर्तवलं आहे.

डॉक्टर म्हणाले की, चाचण्या केल्याशिवाय असं व्यापक विधान करणं बेजबाबदारीचं आहे आणि मधुमेह आणि मधुमेह असलेल्या मुलांच्या पालकांनी या निराधार दाव्यांवर विश्वास ठेवल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

३) योगा 'समलैंगिकता' वर उपचार

बाबा रामदेव यांनी समलैंगिकतेला "वाईट व्यसन" म्हणून घोषित केलं आणि योग आणि आयुर्वेदाद्वारे हा आजार दुरुस्त करण्याचा दावा देखील केला. इतकंच नाही तर अनेक पतंजली केंद्रांनी समलैंगिकतेला "बरे" करण्यासाठी औषधं आणि गोळ्याही विकल्या. "मी समलैंगिक संबंध बरे करण्याची हमी देतो." असा दावा करून रामदेव यांनी एलजीबीटीक्यूआय समुदायातील लोकांना त्यांच्या योग आश्रमात आमंत्रित केलं होतं.

४) 'जे टोपी घालतात ते भारत माता की जय बोलत नाही'

रोहतक इथं आयोजित सद्भावना परिषदेत बाबा रामदेव यांनी वक्तव्य केलं की, टोपी घालणारे लोक भारत माता की जय बोलत नाहीत. ते म्हणाले की, त्यांचे हात कायद्याशी बांधलेले आहेत अन्यथा अशा कोट्यावधी लोकांचे डोके कापण्याची त्यांची हिम्मत आहे. रोहतकच्या सद्भावना मेळाव्यातील रामदेव यांच्या या विधानानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त झाला. या निवेदनानंतर बाबा रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

५) राहुल गांधींवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया

बाबा रामदेव यांनी राहुल गांधींवर एक वैयक्तिक टिप्पणी केली होती. २०१४ साली बाबा रामदेव म्हणाले, राहुल गांधींना मुलगी मिळत नाही आणि म्हणूनच त्यांचं लग्न होत नाही. रामदेव आपल्या वादग्रस्त विधानात म्हणाले की, राहुल गांधी हनीमून साजरा करायला बाहेर जातात. मग तिथे काय होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. बाबा रामदेव यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि निषेधांसह त्यांचे पुतळे जाळण्यास सुरुवात झाली.

६) शंकराचार्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालावा लागला

बाबा रामदेव यांनी एकदा आदि शंकराचार्यांच्या 'ब्रह्मा सत्यम जगत मिथ्या' या तत्त्वज्ञानाला आव्हान दिलं त्यांनी सांगितलं की, ते लोकांना निरुपयोगी आणि आळशी बनवण्यास जबाबदार आहेत. यानंतर देशभरातील साधूंनी रामदेवविरोधात निदर्शनं केली आणि पुतळ्यांचं दहन केलं. नंतर, त्यांना हरिद्वार इथल्या संत असेंब्लीसाठी याबद्दल माफी मागावी लागली आणि आर्यसामाजी असूनही शंकराचार्यांच्या मूर्तीला हार घातला. मग हा वाद कमी झाला.

७) मदर टेरेसा यांच्यावर टिका

एकदा त्यांनी काँग्रेस सरकार आणि मदर टेरेसा यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, "आतापर्यंत कोणत्याही संतांना भारत रत्न का मिळाला नाही? तर मदर टेरेसा यांना ख्रिश्चन असल्यानं हा पुरस्कार देण्यात आला आहे. परंतु एकाही संताला देण्यात आला नाही कारण ते हिंदू आहेत." महर्षि दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान तपस्वींच्या कुळातील स्वत:ला मानत बाबा रामदेव हिंदू संतांच्या कार्याला कमी लेखण्यासाठी काँग्रेस सरकारवर संताप व्यक्त केला.

८) ‘दोनपेक्षा जास्त मुलं होऊ नयेत'

बाबा रामदेव यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणाबद्दल म्हटलं होतं की, "दोनपेक्षा जास्त मुलांच्या मतदानाचा हक्क असू नये. निवडणुका लढवण्याचा अधिकार असू नये. त्यांना सरकारी शाळा किंवा सरकारी रुग्णालयात प्रवेश देऊ नये. कोणतीही सरकारी नोकरी देऊ नये."



हेही वाचा

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचे नियम १५ जूनपासून लागू

खूशखबर, ईपीएफओ देणार ७ लाख रुपयांचं कोरोना विमा संरक्षण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा