Advertisement

महाराष्ट्रात 'H3N2' च्या 10 नवीन रुग्णांची नोंद

जानेवारीपासून राज्यात इन्फ्लूएंझाचे 3,70,546 संशयित रुग्ण आढळले आहेत

महाराष्ट्रात 'H3N2' च्या 10 नवीन रुग्णांची नोंद
SHARES

सोमवारी राज्यात 'H3N2'चे 10 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे 'H3N2'च्या रुग्णांची संख्या 375 वर पोहोचली आहे. तसेच सोमवारी 15 रुग्णांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या 113 वर पोहोचली आहे.

राज्यात 'H3N2' आणि 'H1N1' रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 01 जानेवारीपासून राज्यात इन्फ्लूएंझाचे 3,70,546 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांना ओसेल्टामिवीर हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये 'एच1एन1'चे 469 आणि 'एच3एन2'चे 375 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 113 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

इन्फ्लूएंझा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याठिकाणी आवश्यक औषधे व उपकरणे साठा करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

Mumbai COVID-19 News: दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी होणारच">Mumbai COVID-19 News: दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी होणारच

केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांना नवीन अद्ययावत सीटी स्कॅन मशीन मिळणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा