Advertisement

पायात घुसला रॉड, तरीही तो वाचला


पायात घुसला रॉड, तरीही तो वाचला
SHARES

पायात घुसलेला रॉड काढून सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी एका बांधकाम मजुराला जीवदान दिलं आहे. १० मार्चला त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.


नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राम यादव हा कामगार कफ परेड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत काम करत होता. पण, त्यादिवशी त्याने हेल्मेट आणि सुरक्षारक्षक जॅकेट घातलं नव्हतं. तो खाली पाणी घेण्यासाठी म्हणून वाकला असता तेवढ्यात त्याच्या मांडीच्या आरपार एक जाड आणि एल शेपचा टोकदार रॉड घुसला. शिवाय, हा रॉड इमारतीवरून त्याच्या मांडीवर पडल्याचं सांगण्यात आलं आहे. २५ मजल्यांची ती इमारत आहे.‌


राम हा मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. तो जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा काही प्राथमिक तपासण्या केल्यानंतर त्याला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. १ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्याच्या मांडीच्या हाडामध्ये तो रॉड घुसला होता. पण, जास्त खोलवर नसल्याकारणाने आत जखमा झाल्या नाही. २० सेंटिमीटरच्या आतपर्यंत हा रॉड घुसला होता.

- डॉ. अविरल जैन, ज्येष्ठ सर्जन, सेंट जॉर्ज रुग्णालय


आता या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. पुढच्या ३-४ दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाईल. आता त्याला फिजीओथेरेपी दिली जात आहे. पण, त्याला पूर्ण बरं होण्यासाठी फिजीओथेरेपी देणं गरजेचं आहे. ज्यामुळे तो पुन्हा काम करू शकेल.  

- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय


हेही वाचा -

पोटात घुसलेली सळई खांद्यातून बाहेर आली, तरीही 'तो' वाचला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा