Advertisement

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर आपल्या निर्णयावर ठाम!

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि मार्ड शिष्ठमंडळ यांच्यातील दुसऱ्या बैठकीतही समाधानकारक निकष न लागल्याने जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर आपल्या निर्णयावर ठाम असून संप चौथ्या दिवशीही सुरुच ठेवला आहे.

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर आपल्या निर्णयावर ठाम!
SHARES

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि मार्ड शिष्ठमंडळ यांच्यातील दुसऱ्या बैठकीतही समाधानकारक निकष न लागल्याने जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर आपल्या निर्णयावर ठाम असून संप चौथ्या दिवशीही सुरुच ठेवला आहे.


संपूर्ण प्रकार?

मुंबईतील जे जे रुग्णालयात सर्जरी वार्ड क्रमांक 11 मध्ये शनिवारी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी 2 निवासी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केली. या हल्ल्यानंतर रुग्णालयाला सुरक्षाव्यवस्था मिळावी या मागणीसाठी जेजे रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. मंगळवारी या संपाचा चौथा दिवस आहे. जे .जे. रुग्णालयाने पुकारलेल्या या संपाला सायन रुग्णालयानेदेखील पाठिंबा देत सोमवारी आपलं कामकाज बंद केलं होतं.

जे जे रुग्णालयात मार्डचे अधिकारी आणि इतर शिष्टमंडळाची बैठक सुरू असून सर्वे रिपोर्टवर चर्चाही होत आहे. डॉक्टरांचा जरी संप असला तरी त्यांची रुग्णसेवा मात्र चालूच आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप असाच चालू राहील.
- डॉ. राहुल दारनोले, जेजे रुग्णालय

जे. जे. रुग्णालयात सलग चार दिवस सुरू असलेल्या संपामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.


हेही वाचा - 

दुसरी बैठकही निष्फळ, जे. जे. रुग्णालयाचा संप 'जैसे थे'

जे. जे. रुग्णालय संप: रुग्णांनी घेतला धसका!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा