Advertisement

जे. जे. रुग्णालयात लवकरच कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग

लवकरच सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील सर. जे. जे. रुग्णालयात कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हे पहिलं कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

जे. जे. रुग्णालयात लवकरच कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग
SHARES

सौंदर्यात भर घालण्यासाठी, शरीरातील दोष दूर करण्यासाठी सिने कलावंत अगदी सहजपणे चेहऱ्याची, शरीराची सर्जरी करून घेतात. सर्वसामान्यांना मात्र हा खर्च परवडणारा नसतो. असं सर्रास म्हटलं जातं. पण, आता तुम्हाला हे बोलण्याची वेळ येणार नाही. कारण, लवकरच सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील सर. जे. जे. रुग्णालयात कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हे पहिलं कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.


रुग्णांची संख्या वाढली

सर. जे. जे. रुग्णालयात केवळ मुंबईतूनचं नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. जे. जे. रुग्णालयात अनेक वर्षांपासून कॉस्मेटिक शस्त्रक्रिया विभाग कार्यरत आहे. पण, मागील काही वर्षांमध्ये सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.


पुरूषांच्या संख्येतही भर

फक्त महिलाच नाही, तर पुरुष देखील काॅस्मेटिक शस्त्रक्रिया करतात. त्यामुळेच जे. जे. रुग्णालयात कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयात स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यापासून हा विभाग सुरू करण्यात येणार आहे.


कुणाला होणार फायदा?

अनेकदा बाळ जन्माला आल्यानंतर स्त्रियांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. वजन वाढणं, स्तनांचा आकार वाढणं अशा समस्या महिलांमध्ये निर्माण होतात. त्यासाठी काही महिला स्तनांचा आकार कमी करण्यासाठी काॅस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेतात. अशा महिलांना या शस्त्रक्रियांचा फायदा होणार आहे.

त्याशिवाय अपघात, शारीरिक दोष, व्यंगामुळे लहान वयात आलेल्या विकृती आदींवर देखील प्लॅस्टिक सर्जरी वा कॉस्मेटिक सर्जरीद्वारे उपचार करून घेणं शक्य होणार आहे.



हेही वाचा-

दररोज एक केळे खा आणि शरीरस्वास्थ जपा

रुग्णहिताची पर्वा कुणाला? बनतोय खासगी रुग्णालयांच्या बाजूचा कायदा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा