Advertisement

जसलोक हॉस्पिटलकडून किशोरवयीन मुलांसाठीचं मुंबईतलं पहिलं क्लिनिक!


जसलोक हॉस्पिटलकडून किशोरवयीन मुलांसाठीचं मुंबईतलं पहिलं क्लिनिक!
SHARES

जसलोक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरने मुंबईतले पहिले किशोरवयीन मुलांसाठीचे क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकला ‘लाइटहाऊस’ असं नाव देण्यात आलं आहे. पौगंडावस्था हा संक्रमणाचा एक काळ आहे. ज्यात मुलांना अनेक प्रश्न आणि आव्हानं येऊ शकतात. म्हणूनच या क्लिनिकमध्ये किशोरवयीन मुलांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


किशोरवयीन आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित

हे क्लिनिक मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. दीर्घकालीन आजाराची ओळख आणि प्रतिबंध, शारिरीक आणि मानसिक बदलांची जाणीव करुन देणे, हे बदल कसे हाताळावेत? आणि आरोग्य समस्येत कसे संवाद साधावे? हा हे क्लिनिक उभारण्यामागचा उद्देश आहे.



डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी 10 ते 24 वर्षे वयोगटातील 2.6 दशलक्ष मुलं पौगंडावस्थेत मरतात. ज्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. म्हणूनच, जसलोक हॉस्पिटल सेंटरतर्फे गर्भवती, युवक, प्रौढ आणि तरुण मुला-मुलींसाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे.

जसलोक हॉस्पिटलने नेहमीच लोकांच्या भल्यासाठी कार्य केले आहे. हा उपक्रम मुख्यत: किशोरवयीन मुलांसाठी सुरू करण्यात आला आहे. मुलांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, हाच यामागचा उद्देश आहे.

डॉ. तारंग ग्यानचंदानी, सीईओ, जसलोक हॉस्पिटल

शिवाय, या केंद्राचा फायदा किशोरवयीन मुलांपासून सर्वांना होणार असल्याचंही डॉ. ग्यानचंदानी यांनी स्पष्ट केलं.


‘लाइटहाऊस’ केंद्राची वैशिष्ट्ये

  • स्त्रियांना असणारे आजार, म्हणजेच मासिक पाळीत अनियमितता यावर विशिष्ट चर्चा
  • शरीराच्या बाबतीत असणारे आजार जसे की, मुरुम, त्वचेचे विकार, लठ्ठपणा आणि डोळ्यांखाली येणारे डार्क स्पॉट यासाठी योग्य सल्ल्यानुसार उपचार
  • आहाराबाबत सल्ला
  • भावनिक/वर्तणुकीचा सल्ला
  • फिटनेस कौन्सिलिंग
  • गर्भनिरोधक समुपदेशन



हेही वाचा

कॅन्सरसाठी डॉक्टरांना ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरिअल सिरीज


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा