Advertisement

भारतात जॉन जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या तिसऱ्या लसीला मंजुरी मिळणार?

कोरोना विरोधात लढण्यासाठी आता भारतात जॉन जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

भारतात जॉन जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या तिसऱ्या लसीला मंजुरी मिळणार?
SHARES

कोरोना विरोधात लढण्यासाठी आता भारतात जॉन जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या लसीवर आता अन्न आणि औषध प्रशासन(एफडीए)च्या सल्लागारांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. अमेरिकन लस निर्मीती कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनने दावा केला आहे की त्यांची लस ही अमेरिकेत ७२ टक्के तर जगभरात ६६ टक्के प्रभावी आहे.

याच आधारे आता या लसीला भारतातही काही दिवसातचं मंजुरी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एफडीएकडून अमेरिकेच्या या तिसऱ्या लसीला अनुमत देण्याच्या निर्णयाच्या अगदी जवळ आहे. या आधी जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीने त्यांची लस ही ९४ टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं होतं. या लसीचा एकूण ४४ हजार लोकांवर यशस्वी प्रयोग झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीच्या या तिसऱ्या लसीकरणाला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. तसेच आफ्रिकेतील सात देशांतही चांगला प्रभाव दिसून आला असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. अमेरिकेत सध्या ४.४५ कोटी नागरिकांना फाइजर मोडेरनाद्वारे निर्मित लसीचे प्रत्येकी एक डोस देण्यात आला आहे. तर दोन कोटी लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

येत्या आठवड्याभरात अमेरिकन सरकारकडे या लसीच्या इमर्जन्सी वापराची विनंती करण्यात येईल. त्यानंतर जगातल्या विविध देशांमध्येही ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल. अमेरिकेत मंजुरी मिळाल्यानंतर याचे वितरण सुरु करण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा